आज शनि जयंतीनिमित्त 'या' आठ गोष्टींचे दान ठरेल तुम्हाला लाभदायक!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 02:32 PM2021-06-10T14:32:19+5:302021-06-10T14:32:40+5:30
ज्येष्ठांची सेवा, गरजूंना दान, मदत केली असता शनी देवांचा आशीर्वाद कायम सोबत राहतो.
आक वैशाख अमावस्या आणि शनि जयंती चा उत्सव. आजच्या दिवशी सूर्यदेवाला पुत्र झाला. त्याचे नाव शनिदेव. त्यांचा मूळ स्वभाव अतिशय करडा आणि शिस्तप्रिय आहे. म्हणून त्यांना न्यायाची देवता म्हणून संबोधले जाते. त्यांची आणि हनुमंताची घनिष्ट मैत्री आहे. यासाठी शनी जयंतीच्या मुहूर्तावर शनी देव आणि हनुमान या दोहोंची भक्तिभावे पूजा करतात. आजच्या दिवशी पूजेबरोबरच पुढील ८ गोष्टींचे किंवा यापैकी एखाद्या गोष्टीचे गरजू व्यक्तीला दान केले असता शनी देवांची कृपा प्राप्त होते, अशी भावना आहे.
शनि जयंतीशी संबंधित एक कथा
'स्कंद पुराण' मधील एका आख्यायिकेनुसार सूर्य देवाने राजा दक्ष याच्या कन्येशी लग्न केले. त्यांना तीन संतान झाले. सूर्यदेवाने त्यांचे नाव यम, यमुना आणि मनु ठेवले. शनी देवाच्या वेळी गर्भ राहिलेला असताना संज्ञेला शनिदेवाचे गर्भारपण सोसले नाही. म्हणून तिने आपली सावली सूर्यदेवाजवळ सोडून ती तेथून निघून गेली. काही काळानंतर हा पुत्र स्वरूपात प्राप्त झाला. म्हणून त्यांना सूर्यपुत्र तसेच छाया मार्तंड अशी ओळख मिळाली.
अशा शनी देवांची मनोभावे पूजा केल्यावर त्यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून पुढील गोष्टी दान कराव्यात.
१. काळे तीळ,
२.उडीद ,
३. शेंगदाणा तेल,
४. काळी मिरी
५. लोणचे,
६. लवंगा,
७. काळे मीठ,
८. काळे कपडे
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यावर या वस्तूंचे तसेच लोखंडी वस्तूचे दान केले जाते. याशिवाय ज्येष्ठांची सेवा, गरजूंना दान, मदत केली असता शनी देवांचा आशीर्वाद कायम सोबत राहतो.