"अक्कलकोटची परंपरा आणि संदेश"... डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्याशी आज  LIVE संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:35 PM2020-10-10T12:35:52+5:302020-10-10T12:37:46+5:30

डॉ. पुरुषोत्तम यांचा अक्कलकोटशी आणि स्वामी समर्थांच्या विचारांशी घनिष्ट संबंध आल्यामुळे, अक्कलकोटची परंपरा आणि संदेश या विषयावरील त्यांच्याकडून मिळणारी माहिती, भाविकासांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. 

"Tradition and message of Akkalkot" by Dr. Purushottam Rajimwale LIVE today | "अक्कलकोटची परंपरा आणि संदेश"... डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्याशी आज  LIVE संवाद

"अक्कलकोटची परंपरा आणि संदेश"... डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्याशी आज  LIVE संवाद

googlenewsNext

स्वामी समर्थांचे जीवन चरित्र अतिशय चमत्कृतीपूर्ण लीलांनी युक्त आहे. मात्र, चमत्काराबरोबरच स्वामींनी आपल्या शिष्यांना जो उपदेश केला, त्याची विस्तृत माहिती मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशानं आज, १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता 'लोकमत भक्ती' या यू ट्युब चॅनेलवर डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्याशी अभिनेत्री गिरीजा ओक संवाद साधणार आहे. 'अक्कलकोटची परंपरा आणि संदेश'  याबद्दल डॉ. राजीमवाले सविस्तर माहिती देतील.

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. 

अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.

डॉ. पुरुषोत्तम यांचा अक्कलकोटशी आणि स्वामी समर्थांच्या विचारांशी घनिष्ट संबंध आल्यामुळे, अक्कलकोटची परंपरा आणि संदेश या विषयावरील त्यांच्याकडून मिळणारी माहिती, भाविकासांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. 

विषय :   अक्कलकोटची परंपरा आणि संदेश
वक्ते :     डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले 
निवेदन:  गिरीजा ओक
दिनांक :  १० ऑक्टोबर, रात्री ८ वाजता. 

Web Title: "Tradition and message of Akkalkot" by Dr. Purushottam Rajimwale LIVE today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.