सुख-समृद्धीसाठी घरात जास्वदांचे झाड 'या' ठिकाणी लावा, वास्तूशास्त्रानुसार याचे असंख्य फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:29 PM2022-05-20T17:29:27+5:302022-05-20T17:30:02+5:30
वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला (Hibiscus) विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. जास्वंदीची लाल फुलं पूजाविधीसाठी वापरली जातात. श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचं फूल प्राधान्यानं वापरलं जातं. जास्वंदीचं झाड घरात लावल्यास अनेक फायदे होतात.
घर आकर्षक दिसावं, त्यातलं वातावरण चांगलं राहावं, यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुलझाडं लावतात. काही जण छंद किंवा आवड म्हणून टेरेस गार्डनिंग (Terrace gardening) करतात. वास्तुशास्त्रातही (Vastu Shastra) या गोष्टींना महत्त्व दिलं गेलं आहे. दिशेनुसार घरात काही विशिष्ट वनस्पती किंवा फुलझाडं लावल्यास सकारात्मक वातावरण कायम राहतं. तसंच घरात सुख-समृद्धी नांदते, असं वास्तुशास्त्राचे अभ्यासक सांगतात. तुळस असो अथवा मनीप्लांटचा वेल, प्रत्येक झाडाचं महत्त्व वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला (Hibiscus) विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. जास्वंदीची लाल फुलं पूजाविधीसाठी वापरली जातात. श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचं फूल प्राधान्यानं वापरलं जातं. जास्वंदीचं झाड घरात लावल्यास अनेक फायदे होतात.
घरात नेहमी अशांतता असते, पैसा टिकत नाही, नकारात्मक वातावरण असतं, अशी तक्रार अनेक जण नेहमी करताना दिसतात. वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत. योग्य दिशेला फुलझाडं किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होऊ शकतात. जास्वंदीचं लाल फूल म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती श्री गणेशाची (Shri Ganesh) मूर्ती. कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे. वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर (North) किंवा पूर्व दिशेला (East) जास्वंदीचं झाड लावल्याने घरातलं वातावरण चांगलं राहतं. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही.
सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळही लावू शकता. याव्यतिरिक्त, घरात हे झाड लावण्याचे अनेक फायदे आहेत. तसंच लाल फुलांमुळे घराचं सौंदर्य अधिकच खुलतं. धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे. हे फूल कालिमाता आणि श्रीगणपतीला अर्पण केलं जातं. जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. रोजच्या पूजेसाठीदेखील या फुलाचा वापर होतो. मंगळवारी श्री हनुमानाला (Hanuman) जास्वंदीचं फूल अर्पण करणं चांगलं मानलं जातं. सूर्यदेवाची उपासना आणि पूजाविधीतही लाल जास्वंद फुलाचा वापर केला जातो.