Vande Mataram: १० नोव्हेंबरला १० मिनिटं देशासाठी; 'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीताला होणार १५० वर्ष पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 01:40 PM2024-11-09T13:40:31+5:302024-11-09T13:41:05+5:30
Vande Mataram: बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या 'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीताला १० नोव्हेंबर रोजी तिथीने १५० वर्ष पूर्ण होत आहेत; त्यात आपण 'असे' देऊया योगदान!
भारत मातेला वंदन करणारे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' १५० वर्षांपूर्वी कार्तिक शुद्ध नवमीला लिहिले गेले. ही तिथी कुष्माण्डा नवमी या नावेही ओळखली जाते. या तिथीला देवीने जसा कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध केला आणि देवतांना अभय दिले, त्याचप्रमाणे आपली भारत भूमी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली म्हणून तत्कालीन प्रख्यात कादंबरीकार आणि कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे राष्ट्रीय गीत लिहिले. बालपणापासून आपण त्याचे एकच कडवे म्हणत आलो आहोत. मात्र चॅटर्जी यांनी त्याच काव्यात मातृभूमीच्या स्तुतीपर आणखी चार कडवी लिहिली आहेत. त्या शब्दांशी परिचय करून घेऊ आणि १० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता आपल्या कुटुंबासह, सोसायटीतल्या रहिवाशांसह, मित्र-परिवारासह हे सामूहिक गीत गायन करून मातृभूमीला वंदन करूया. कारण, ईश्वरभक्ती, गुरुभक्ती, मातृ-पितृ भक्ति एवढीच महत्त्वाची आहे देशभक्ती!
वंदे मातरम्
वंदे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
सस्य शामलां मातरम्।
शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्
सुखदां वरदां मातरम् ॥१॥
वंदे मातरम।
कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम् ॥२॥
वंदे मातरम।
तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणा: शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे मातरम् ॥३॥
वंदे मातरम।
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलां
सुजलां सुफलां मातरम् ॥४॥
वंदे मातरम।
श्यामलां सरलां
सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम् ॥५॥
वंदे मातरम्।
भारत माता की जय|