Varuthini Ekadashi 2024: बांधवगडच्या राष्ट्रीय उद्यानात विश्रांती घेत आहे ६५ फूट लांब महाकाय विष्णू मूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 07:00 AM2024-05-04T07:00:00+5:302024-05-04T07:00:02+5:30

Varuthini Ekadashi 2024: मुलांना उन्हाळी सुट्यांमध्ये बांधवगड येथे नेण्याचा योग आला तर तिथे ही विष्णू मूर्ती आढळेल; वरुथिनी एकादशीनिमित्त वाचा सविस्तर माहिती. 

Varuthini Ekadashi 2024: 65ft Giant Vishnu Idol Resting in Bandhavgarh National Park! | Varuthini Ekadashi 2024: बांधवगडच्या राष्ट्रीय उद्यानात विश्रांती घेत आहे ६५ फूट लांब महाकाय विष्णू मूर्ती!

Varuthini Ekadashi 2024: बांधवगडच्या राष्ट्रीय उद्यानात विश्रांती घेत आहे ६५ फूट लांब महाकाय विष्णू मूर्ती!

बांधवगढ राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यातील उमरिया जिल्ह्यात आहे. १९६८ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. हे मध्य प्रदेशातील एक असे राष्ट्रीय उद्यान आहे जे ३२ टेकड्यांनी वेढलेले आहे. या ठिकाणी अनेक फळांची व फुलांची झाडे आहेत, वाघाखेरीज अनेक प्राणीही आढळतात जे सहज पाहता येतात आणि इतर अनेक प्राणी व पक्षीही येथे आढळतात. त्याबरोबरच तेथील भव्य विष्णू मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. 

बांधवगड हे फक्त वाघांसाठी प्रसिद्ध असले तरी या ठिकाणी अनेक भाविक विष्णूमूर्तीच्या दर्शनासाठी देखील येतात. बांधवगड नॅशनल पार्कमधील डोंगरावर असलेले शेष शैय्या हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला पायी जावे लागते. येथे भगवान विष्णू निद्रावस्थेत पहुडले आहेत. या मूर्तीची रचना अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध आहे. शिवपुराण आणि नारद-पुराणातही त्याचा उल्लेख आहे.

शेष शय्या बांधवगढ:

बांधवगडच्या टेकडीवर २ हजार वर्षे जुना किल्ला बांधला आहे, या किल्ल्याचे नाव शिवपुराणात आढळते. गडाचे बांधकाम कोणी केले? आजही याबाबत शंका आहेत. येथे शेषशैया हे प्रसिद्ध ठिकाण आहे.भगवान विष्णूची महाकाय मूर्ती अतिशय आकर्षक आणि रहस्यमय आहे. भगवान विष्णूची ही मूर्ती ६५ फूट लांब आहे. 

आत्तापर्यंत तुम्ही भगवान विष्णूच्या अनेक मूर्ती पाहिल्या असतील. क्षीरसागरमध्ये विश्रांतीच्या मुद्रेत त्याचे रूप क्वचितच दिसते. भगवान विष्णू इथे सात फणा असलेल्या नागावर म्हणजेच शेष नागावर निद्रावस्थेत विराजमान आहेत. चरणगंगा ही येथील मुख्य नदी आहे जी उद्यानातून जाते. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार चरणगंगा नदीचा उगम भगवान विष्णूच्या चरणकमलातून झाला. त्यामुळे या नदीचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते, हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने दिवाळीनिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

बांधवगड शेषशैया येथे वर्षातून एकदा जन्माष्टमीच्या वेळी येथे भव्य जत्रा भरते. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तिथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची इच्छा भगवान विष्णू पूर्ण करतात. वर्षातून एकदा भरणाऱ्या या जत्रेत हजारो लोक पोहोचतात. राष्ट्रीय उद्यानातील बांधवगड टेकडीवर असलेला बांधवगड किल्ला आणि शेषशैया हे या ठिकाणचे प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. राजवाड्यातून आजूबाजूची झाडे, वनस्पती आणि प्राणी यांचे दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करून सोडते. आता बांधवगड किल्ला आणि व्याघ्र प्रकल्प एकत्र आले असले तरी श्रद्धा आणि प्रेक्षणीय स्थळ यांचा अनोखा संगम इथे पाहायला मिळतो.

Web Title: Varuthini Ekadashi 2024: 65ft Giant Vishnu Idol Resting in Bandhavgarh National Park!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.