Vastu Shastra: प्लॉट खरेदी करताय? थांबा! तत्पूर्वी आज दुपारी जाणून घ्या या विषयाशी संबंधित वास्तूटिप्स लोकमत भक्तीवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 12:44 PM2022-10-21T12:44:43+5:302022-10-21T12:45:15+5:30
Vastu Tips: वास्तुखरेदीनंतर वास्तुदोष जाणून घेण्यापेक्षा खरेदीपूर्व केलेल्या सूचना आज जाणून घ्या!
घरखरेदी, जमीन खरेदी हे मोठे विषय आणि दीर्घ काळासाठी पैशांची गुंतवणूक असते. खरेदीनंतर त्यात दोष येऊ नयेत यासाठी खरेदीपूर्व विचार होणे गरजेचे आहे. अनेकांना वास्तू खरेदीनंतर वास्तू दोष जाणवू लागतात. मग ते निवारणासाठी वेगळा खर्च करावा लागतो. यासाठी घर किंवा प्लॉट खरेदी करताना काही सतर्कता बाळगली तर नंतर होणारा त्रास टाळता येईल. पैसे दिले आणि वास्तू, जागा, घर खरेदी झाली असे होत नाही. ज्याप्रमाणे आपणं नवीन जागी सभोवतालचा परिसर, शेजार, पाणी, वीज, दवाखाना, स्टेशन, बसस्थानक इत्यादी गोष्टी पाहतो, त्याप्रमाणे ती जागा सदोष नाही ना, हे केवळ वास्तूतज्ज्ञ सांगू शकतात. याबाबतीत त्यांचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरतो.
यासाठीच वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव आज दुपारी अर्थात २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर आपल्या भेटीस येणार आहेत. जागा कशी निवडावी, कोणती दिशा शुभ, जागेच्या आसपास असलेल्या गोष्टी अशा विविध विषयांवर ते प्रकाश टाकतील. त्यामुळे आजची भेट चुकवू नका. कारण हेच नियम तुम्हाला घर खरेदीच्या वेळीही कामी येतील.