Vastu Shastra: वैवाहिक जीवनात रोजचे वाद? वास्तुशास्त्र देईल साथ! वाचा 'हे' नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 04:29 PM2023-12-19T16:29:44+5:302023-12-19T16:30:03+5:30

Vastu Tips: रोजच्या भांडणांमुळे घरात प्रगती थांबते आणि कुटुंबातील सदस्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो; तो टाळण्यासाठी पुढील नियम पाळा!

Vastu Shastra: Daily arguments in married life? Vastu Shastra will support! Read 'These' Rules! | Vastu Shastra: वैवाहिक जीवनात रोजचे वाद? वास्तुशास्त्र देईल साथ! वाचा 'हे' नियम!

Vastu Shastra: वैवाहिक जीवनात रोजचे वाद? वास्तुशास्त्र देईल साथ! वाचा 'हे' नियम!

घर म्हटले की भांड्याला भांडं लागणारच! पण रोजच्या वादामुळे घराची युद्धभूमी होऊ शकते. असे प्रसंग टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात छोटे छोटे उपाय दिले आहेत जे तुमचे वैवाहिक जीवन सुखी बनवण्यात मदत करतील. आपण या नियमांचे सहजपणे पालन करू शकता. या नियमांमुळे वास्तू दोष दूर होऊन घरात शांतता टिकून राहण्यास मदत होते. 

हे नियम पती पत्नीने पाळणे सक्तीचे आहे

  • जर पती-पत्नीमध्ये वाद झाला, तर दोघेही चिडतात, म्हणजेच एखाद्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड वाढली तर वाद विकोपाला जातात. अशा वेळी आग्नेय दिशेला डोकं करून झोपू नये. अन्यथा, मनात अस्वस्थता निर्माण होईल. परिणामी, संघर्षाची शक्यता वाढते.
  • जर बेडरूमची खिडकी दक्षिण किंवा दक्षिण पश्चिमेला मध्यभागी उघडत असेल तर ती अनेकदा बंद ठेवावी. त्या दिशेने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करून वातावरण तणावग्रस्त होते. 
  • बेडरुममधील बेड आणि दारातून आवाज येऊ नये. वेळच्या वेळी त्याची डागडुजी करून घ्यावी. 
  • झोपण्याच्या स्थितीत डोके दक्षिणेकडे असावे. यामुळे चांगली झोपही येते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते.
  • घरात फिश टॅंक असेल तर हरकत नाही, पण बेडरूम मध्ये फिशटॅन्क ठेवू नका. तो हॉलमध्येच ठेवा. 
  • दाम्पत्याचे झोपण्याचे ठिकाण अर्थात अंथरूण किंवा बेड दारासमोर नसावे तसेच खिडकीखाली नसावे. खिडकीखाली बेड असल्यास खिडकीला पडदा लावून घ्यावा. 

  • पती-पत्नीने उत्तर-पश्चिम कोपऱ्यात झोपावे. डोकं शांत राहते, वाद कमी होतात. 
  • बेडरूममध्ये हलक्या रंगाचा पेंट वापरावा. भिंतींवर उग्र चित्रे लावू नका. बेडरुममध्ये मृत व्यक्तीचा अर्थात पूर्वजांचा फोटो लावू नका.
  • त्याऐवजी पती पत्नीचा छानसा फोटो फ्रेम करून बेडरूममध्ये लावा. तो फोटो पती पत्नीमधील मतभेद मिटवण्यास हातभार लावेल!
  • घर लहान असले तरी आपल्या झोपण्याच्या जागी किंवा बेडरूम मध्ये देवघर लावू नका. 
  • घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा आणि पाण्याची बेडरूम मध्ये झोपताना पाण्याचा तांब्या भांडे खोलीच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. 
  • दर शनिवार रविवार एकत्र देव दर्शनाला जा. दिवसभरातील एक जेवण तरी एकत्र बसून जेवा. संवाद झाले नाहीत तरी हरकत नाही, सहवासातून प्रेम उत्पन्न होईल याची खबरदारी घ्या!

Web Title: Vastu Shastra: Daily arguments in married life? Vastu Shastra will support! Read 'These' Rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.