Vastu Shastra: उन्हाळ्यात चुकवू नका जलदानाची संधी; वापरा मातीची भांडी, होईल अपार लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:29 PM2024-03-19T12:29:11+5:302024-03-19T12:29:29+5:30
Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार घरात मातीच्या भांड्यांचा वापर जेवढा जास्त तेवढी सुख समृद्धी नांदते; उन्हाळ्यात आपणही त्याचा आवर्जून वापर करायला हवा!
पूर्वी घरोघरी बारमाही माठातले पाणी पिण्याची सवय होती. कालांतराने फ्रिज आला. लोक बाटलीतून पाणी पिऊ लागले. अलीकडच्या काळात वॉटर प्युरिफायर आले, लोक थेट त्याच्या नळाने पाणी पिऊ लागले. परंतु आजही पाण्याची खरी तहान भागते, ती माठातल्या पाण्यानी. म्हणून उन्हाळा येताच घरोघरीचे अडगळीत ठेवलेले माठ स्वयंपाकघरात स्थानापान्न होतात आणि थंड पाण्याचा स्रोत बनतात. पण याचा संबंध वास्तुशात्रज्ञांनी वास्तूच्या भरभराटीशीदेखील जोडला आहे. कसा तो पहा-
>>वास्तुशास्त्रानुसार घरात वापरात असलेला पाण्याचा भरलेला माठ घरातील समस्यांचे निराकरण करतो.
>>जलदान हे श्रेष्ठ दान आहे. विशेषत: उन्हाळ्यात थंड पाणी ही सर्वांचीच गरज असते. म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसेच चौकाचौकांमध्ये पाण्याचे मोठाले माठ भरून ठेवले जातात. तसेच पशु पक्ष्यांसाठी पाण्याचा कृत्रिम हौद, तलाव बांधले जातात. घराघरातील खिडक्यांमध्येही चिमणी पाखरांसाठी आवर्जून दाणा पाणी ठेवले जाते. हे पाणी मातीच्या भांड्यातून ठेवले असता त्यांनाही थंडगार पाण्याचा लाभ मिळतो.
>> उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे. म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेस माठ ठेवला पाहिजे.
>> घरात कोणाला मानसिक ताणतणाव असेल,तर त्यांना माठातील पाण्याने कोणत्याही झाडाला, रोपाला सलग काही दिवस पाणी द्यायला सांगा. मानसिक तणाव नक्की दूर होईल.
>>मातीचा माठच नाही, तर मातीची मूर्तीदेखील डोळ्यांना अतिशय आनंद देते.
>>घरात शोभेसाठीदेखील मातीच्या कलात्मक माठांमध्ये दिवा प्रज्वलित केल्यास घराचे वातावरण सत्मविक होते. त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते.