Vastu Shastra: घरातील टॉयलेट आणि बाथरूमची स्वच्छता तुमच्या भाग्याचे दार कसे उघडते, जाणून घ्या आज लोकमत भक्तीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:30 PM2022-08-19T12:30:43+5:302022-08-19T12:31:05+5:30

Vastu Tips: स्वच्छतेचा मूलमंत्र आणि आर्थिक बाबींशी जोडलेला धागा आज उलगडून सांगणार आहेत वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव!

Vastu Shastra: How Cleaning Toilets and Bathrooms at Home Opens the Door to Your Fortune, Know Today on Lokmat Bhakti! | Vastu Shastra: घरातील टॉयलेट आणि बाथरूमची स्वच्छता तुमच्या भाग्याचे दार कसे उघडते, जाणून घ्या आज लोकमत भक्तीवर!

Vastu Shastra: घरातील टॉयलेट आणि बाथरूमची स्वच्छता तुमच्या भाग्याचे दार कसे उघडते, जाणून घ्या आज लोकमत भक्तीवर!

googlenewsNext

स्वच्छता जिथे लक्ष्मी वसे तिथे! हे आपण ऐकले असेलच. म्हणजेच आर्थिक स्थिरता तसेच आरोग्य यांचा घराच्या टॉयलेट-बाथरूमशी जवळचा संबंध असतो. त्यासाठी स्वच्छतेबरोबर कोणती खबरदारी घ्यायला हवी, यावर आज दुपारी ३ वाजता वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, तेही आपल्या लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!

तुमचे घर कितीही स्वच्छ असू द्या, पण टॉयलेट बाथरूम स्वच्छ नसेल तर तुमची वास्तू कधीच तुम्हाला लाभ देणार नाही हे लक्षात ठेवा. घरातले टॉयलेट बाथरूम यावर आरोग्य आणि आर्थिक बाबी अवलंबून असतात. त्यामुळे दैनंदिन कामात या दोन्हीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. याशिवाय वास्तू रचना करताना टॉयलेट, बाथरूमची दिशा चुकीची असेल किंवा त्याच्या विरुद्ध दिशेला किचन, देवघर, बेडरूम यांची रचना केलेली असेल तर कोणती दक्षता घ्यायला हवी. कोणते उपाय केले असता घरात रोगराई शिरणार नाही व वास्तू दोष उद्भवणार नाहीत, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आज दुपारी लोकमत भक्तीच्या युट्युब चॅनेलला भेट द्यायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. 

वास्तुशास्त्राशी संबंधित आणखीही विषयावरील मोफत माहिती मिळवण्यासाठी लोकमत भक्तीचे युट्युब चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा!

Web Title: Vastu Shastra: How Cleaning Toilets and Bathrooms at Home Opens the Door to Your Fortune, Know Today on Lokmat Bhakti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.