Vastu Shastra: दिनदर्शिका आणि वास्तुशास्त्र यांचे परस्पर नाते किती महत्त्वाचे असते, जाणून घ्या लोकमत भक्तीवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:49 PM2022-10-14T15:49:38+5:302022-10-14T15:50:19+5:30
vastu tips: सणवार नुसते माहीत असून उपयोग नाही तर मुहूर्त व वास्तुशास्त्राचा संबंध जाणून घेणेही महत्त्वाचे आहे, कसे आणि कुठे ते जाणून घेऊ.
पूर्वीच्या काळी घराघरात पंचांग वाचन होत असे. गुढी पाडव्याला पंचांगाची खरेदी होत असे आणि गुरुजी किंवा जाणकार व्यक्तीकडून वार्षिक पंचांग वाचन होत असे. त्यामुळे सण, वार, तिथी, मुहूर्त अशी इत्थंभूत माहिती त्यात मिळत असे. काळ बदलला. लोंकांचे जीवनमान गतिशील झाले. त्यामुळे पंचांग वाचन मागे पडले आणि त्याला पर्याय निघाला दिनदर्शिकेचा. आपले वर्ष, वार, महिने इंग्रजी वर्षानुसार चालत असले, तरीदेखील दिनदर्शिकेत हिंदू सणांची तपशीलवार माहिती दिली जाते. पण तिचेही वाचन महत्त्वाचे आहे.
वास्तुशास्त्रात दिनदर्शिकेचे महत्त्व काय, कसे व किती आहे, याबद्दल सविस्तर माहिती आज अर्थात १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव आपल्याला देणार आहेत. वास्तूशी संबंधित माहिती, तोडगे याबद्दल ते नेहमी आपल्याला मोफत मार्गदर्शन करतात. आजही लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर ते दिनदर्शीचे महत्त्व समजावून सांगणार आहेत. ते जाणून घ्यायला विसरू नका.