Vastu Shastra: घरासमोर पडीक जमीन किंवा जवळच स्मशान असेल तर वास्तू शास्त्रात दिलेले उपाय जरूर करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 04:19 PM2022-12-26T16:19:27+5:302022-12-26T16:19:47+5:30

Vastu Tips: वास्तू सदैव प्रसन्न असावी, त्यात सकारात्मक ऊर्जा असावी असे वाटत असेल तर वास्तू दोष निर्माण करणारे घटक दूर केले पाहिजेत. 

Vastu Shastra: If there is a waste land in front of the house or a crematorium nearby, do the solution given in Vastu Shastra! | Vastu Shastra: घरासमोर पडीक जमीन किंवा जवळच स्मशान असेल तर वास्तू शास्त्रात दिलेले उपाय जरूर करा!

Vastu Shastra: घरासमोर पडीक जमीन किंवा जवळच स्मशान असेल तर वास्तू शास्त्रात दिलेले उपाय जरूर करा!

googlenewsNext

वास्तुशास्त्राप्रमाणे फेंगशुईमध्येही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यावर आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यावर भर देण्यात आली आहे.फेंगशुईमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या गोष्टींचे पालन केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. कुटुंबातील कलह घरातील सुख-शांती हिरावून घेतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा येतो. अशा परिस्थितीत फेंगशुईच्या वास्तू नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. याने जीवनातील समस्या सोडवता येतात.

फेंग शुईचे तसेच वास्तू शास्त्राचे महत्त्वाचे नियम

>>वास्तू शास्त्रानुसार घराच्या जवळपासच्या परिसरात स्मशान किंवा एखादी पडीक जमीन नसावी. त्यामुळे नकारात्मक लहरी घरात येतात. नाईलाजाने अशा ठिकाणी घर घ्यावे लागले तर धार्मिक विधी करून मगच गृहप्रवेश करावा. वास्तू शांत सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने केली तरी चालेल, मात्र गणेश पूजन करूनच गृहप्रवेश करावा. त्यामुळे घराच्या सभोवतालची स्पंदने, ऊर्जा, वातावरण सकारात्मक होण्यास मदत होईल. 

>> वास्तूच्या सभोवती कचऱ्याचे ढीग असतील तर कामगारांच्या मदतीने ते स्वच्छ करून घ्यावेत. त्यामुळे रोगराई पसरेल शिवाय वास्तुदोष निर्माण होतील. तसेच घराजवळ स्मशान भूमी असेल किंवा खिडकीतून स्मशान दिसत असेल तर ती खिडकी बंद ठेवावी किंवा कायमस्वरूपी तिथे पडदा लावून ठेवावा. 

>>घराचा मागचा दरवाजा समोरच्या दरवाजासमोर नसावा. असे मानले जाते की, घरामध्ये प्रवेश करताच जीवन ऊर्जा निघून जाते. तुमच्या घराची रचना अशी असेल तर मधल्या जागी पडदा लावून घ्या किंवा शक्य असल्यास दार बसवून घ्या. 

>>घराच्या मुख्य गेटसमोर कचराकुंडी ठेवू नका. घराच्या आवारात एखाद्या कोपऱ्यात ठेवा परंतु प्रवेशद्वारासमोर ठेवू नका. 

>>फेंगशुईमध्ये, स्वयंपाकघर आणि शौचालय समोरासमोर असणे दोषपूर्ण मानले जाते. एक तर स्वयंपाक घराची जागा बदला किंवा घर लहान असेल तर पडद्याचा वापर करा. 

>>तुमचा बंगला असेल तर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घराच्या मध्यभागी पायऱ्या बनवू नका. 

>>घरातील खिडक्यांची दारे घरात नाही तर बाहेरच्या दिशेने उघडणारी असावीत! असे केल्याने घरात जीवन उर्जेचा अधिक प्रवाह होतो. तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

Web Title: Vastu Shastra: If there is a waste land in front of the house or a crematorium nearby, do the solution given in Vastu Shastra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.