Vastu Shastra: घरात कोणत्या दिशेला पैसा ठेवल्याने वाढतो आणि कोणत्या दिशेला ठेवल्याने घटतो? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:33 AM2023-03-22T11:33:00+5:302023-03-22T11:35:02+5:30

Vastu Shastra: Vastushastra : हातात पैसा टिकत नाही? मग 'हे' उपाय करून बघा; म्हणजे पैसा टिकेलही आणि वाढेलही!

Vastu Shastra: In which direction placing money in the house increases and which direction decreases it? Find out! | Vastu Shastra: घरात कोणत्या दिशेला पैसा ठेवल्याने वाढतो आणि कोणत्या दिशेला ठेवल्याने घटतो? जाणून घ्या!

Vastu Shastra: घरात कोणत्या दिशेला पैसा ठेवल्याने वाढतो आणि कोणत्या दिशेला ठेवल्याने घटतो? जाणून घ्या!

googlenewsNext

कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल, की माझ्या हातात पैसा टिकत नाही. यासाठी ते आर्थिक जबाबदारी घेणेसुद्धा टाळतात. कदाचित तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असू शकता. पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतात असे नाही, परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात. अचानक आरोग्याच्या तक्रारी, घरातली छोटी मोठी खरेदी, कोणाची जुनी देणी वगैरे काहीही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जातो. एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचाही मनःस्ताप होणे स्वाभाविकच आहे. यावर वास्तू शास्त्राने सांगितलेला तोडगा आजमावून बघा. 

आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ती चिंताजनक बाब आहे. यासाठी पैसे ठेवण्याची जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते. कसे ते सविस्तर जाणून घेऊ. 

पैसा एकाजागी ठेवू नका : हा तोडगा वाचताक्षणी तुम्हाला आपली आई आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाहीत. कधी तांदुळाच्या डब्यात, तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात तर कधी माळ्यावर. याचे कारण हेच, की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा  आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बँकादेखील अनुसरतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात ग्राहकाचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तजवीज करतात. वास्तूशास्त्र देखील हेच सांगते. 

घरात सुरक्षितता पैसा कुठे ठेवायचा?
वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेशी देवतांचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते.

घरातला या दिशेला पैसे साठवू नका!
वास्तुशास्त्राच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये. कारण यामुळे धनाची हानी तर होतेच शिवाय संपत्तीची वाढही थांबते. बराचसा पैसा आरोग्याच्या समस्यांवर खर्च होतो. यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. तसेच या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो. पैशांचा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा आणि हा बिनखर्चिक पर्याय वापरून पैशांची वृद्धी होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. 

Web Title: Vastu Shastra: In which direction placing money in the house increases and which direction decreases it? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.