Vastu Shastra: घरात 'हे' रोपटे लावा, पैसा चुंबकासारखा घराकडे खेचला जाईल आणि आर्थिक चणचणही भासणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 04:54 PM2022-11-15T16:54:28+5:302022-11-15T16:54:47+5:30

Vastu Tips: आपल्या आवडीची अनेक रोपं आपण लावतो, त्यात वास्तू शास्त्राने सुचवलेल्या रोपांचा समावेश केल्यास अधिक लाभ होतो.

Vastu Shastra: Plant 'this' in the house, money will be attracted like a magnet and financial problems will not be seen! | Vastu Shastra: घरात 'हे' रोपटे लावा, पैसा चुंबकासारखा घराकडे खेचला जाईल आणि आर्थिक चणचणही भासणार नाही!

Vastu Shastra: घरात 'हे' रोपटे लावा, पैसा चुंबकासारखा घराकडे खेचला जाईल आणि आर्थिक चणचणही भासणार नाही!

googlenewsNext

पैसा मिळवण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे भरपूर कष्ट करत असाल तर, तुमच्या प्रयत्नांना यश मिळावे म्हणून वास्तुशास्त्र सांगत आहे काही प्रभावी तोडगे. त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मणाचे रोप!

नाव नवीन वाटले ना? वास्तविक हे फुल आपल्या नेहमीच्याच पाह्ण्यातले. रानफुलासारखे दिसणारे. फक्त नाव माहित नसल्याने आपण त्याची कधी विशेष दखल घेतली नाही. मात्र वास्तू शास्त्राने त्याचे महत्त्व ओळखून ते आपल्या घरात लावावे असे सांगितले आहे. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ. 

आपले आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी वास्तू शास्त्राने अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मण रोप लावणे. तिलाच लक्ष्मण बुटी असेही म्हणतात. असे म्हटले जाते की हे रोप घरात लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या कुटुंबावर आपला कृपावर्षाव करू लागते. 

लक्ष्मण रोप लावल्याने होणारे फायदे: 

>>वास्तुशास्त्रानुसार एका कुंडीत लक्ष्मणाचे रोप लावल्याने वास्तुदोष दूर होतो. 

>> ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी लक्ष्मण वनस्पती रामबाण उपाय म्हणून काम करू शकते. असे म्हटले जाते की ही वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित करते. ज्या घरात हे रोप लावले जाते त्या घरातून गरिबी दूर होते आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते.

>> ज्या घरात नकारात्मक लहरी असतात, त्या घरातील सदस्यांमध्ये कलह होत राहतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणे होतात. अशा स्थितीत घरामध्ये लक्ष्मणाचे रोप लावल्यास वाईट शक्तींचा प्रभाव संपतो. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. 

>> ज्यांचे नशीब त्यांना साथ देत नसेल, त्यांच्यासाठी लक्ष्मण वनस्पती नशिबाची किल्ली म्हणून काम करेल. ही वनस्पती घरात लावल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतात. घर तसेच वाहन खरेदीचे स्वप्न साकार होते. 

लक्ष्मण रोप लावण्यासाठी योग्य दिशा

लक्ष्मण वनस्पतीची दिशा देखील वास्तुशास्त्रात वर्णन केलेली आहे. वास्तूनुसार घराच्या बाल्कनीमध्ये ईशान्य दिशेला एका मोठ्या कुंडीत हे रोप लावावे. त्याचा अधिक फायदा मिळतो!

Web Title: Vastu Shastra: Plant 'this' in the house, money will be attracted like a magnet and financial problems will not be seen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.