Vastu Shastra: आपल्या वास्तूमध्ये अधिकाधिक पैसा यावा आणि तो दीर्घकाळ टिकावा यासाठी वापरा खास वास्तूटिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:33 PM2022-11-16T17:33:00+5:302022-11-16T17:33:17+5:30

Vastu Tips: पैसा कमावणे हे जीवनाचे ध्येय नसले तरी गरजेपुरता पैसा मिळवावा आणि साठवावा लागतोच, त्यासाठी तुमच्या प्रयत्नांना द्या या वास्तू टिप्सची जोड!

Vastu Shastra: Use Special Vastu Tips to Make Your Vastu Make More Money and Last Longer! | Vastu Shastra: आपल्या वास्तूमध्ये अधिकाधिक पैसा यावा आणि तो दीर्घकाळ टिकावा यासाठी वापरा खास वास्तूटिप्स!

Vastu Shastra: आपल्या वास्तूमध्ये अधिकाधिक पैसा यावा आणि तो दीर्घकाळ टिकावा यासाठी वापरा खास वास्तूटिप्स!

googlenewsNext

अलीकडच्या काळात यशाचे मूल्यमापन आर्थिक स्थिती पाहून केले जाते. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता आर्थिक स्थिती चांगली असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांना साथ लागते नशिबाची आणि लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची. यासाठीच वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव सांगत आहेत काही खास वास्तूटिप्स, ज्यांचा वापर केल्याने तुमच्या घरात पैसा टिकेलही आणि वाढेलही!

लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर वास्तुशास्त्राशी संबंधित अनेक गोष्टी, प्रश्न आणि त्यांचे समाधान यावर दर शुक्रवारी दुपारी ३ वाजता डॉ. रविराज अहिरराव मार्गदर्शन करतात. यातच त्यांनी आर्थिक स्थितीशी संबंधित निवडलेला हा विषय आणि त्याचे समाधान पुढीलप्रमाणे -

आपल्याकडे येणारा पैसा कोणत्या मार्गाने येतो हे पाहणे  गरजेचे आहेत. मार्ग म्हणजे केवळ दिशा नाहीत तर नैतिकताही महत्त्वाची. तुकाराम महाराज म्हणतात, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे' यात उत्तम हा शब्द नैतिकतेला धरून आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. वास्तविक पाहता वास्तूमध्ये ३२ दिशांद्वारे लक्ष्मी प्रवेश करते. त्यापैकी ८ दिशा शुभ मानल्या जातात. ४ मुख्य दिश आणि ४ उपदिशांमधून येणारी लक्ष्मी दीर्घकाळ टिकणारी आणि वाढणारी असते. ती येण्यासाठी, तिच्या स्वागतासाठी पुढील वास्तू टिप्सचा जरूर अवलंब करा!

  • घर  स्वच्छ आणि प्रसन्न असावे: दिवाळीत स्वच्छता केल्यावर आपल्याला जो आनंद जाणवतो तो ३६५ दिवस मिळावा असे वाटत असेल तर घर स्वच्छच हवे. 
  • उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेला प्रवेश द्वार, लिव्हिंग रूम, बाथरूम असेल तर चालेल, पण  तिथे जड वस्तू नको. 
  • ईशान्य, आग्नेय, नैऋत्य या दिशा सकारात्मकता  वाढवणाऱ्या आहेत. त्या नेहमी स्वच्छ ठेवा. 
  • उत्तर आणि ईशान्य दिशेला निळ्या रंगाची वस्तू ठेवा, व्यवसाय-उद्योगात नवीन संधी मिळतील.. 
  • पूर्व दिशेला हिरव्या रंगाची वस्तू किंवा एखादे छानसे रोपटे लावा, नवीन लोकांशी परिचय होऊन तुमचा करिअर मध्ये विकास होईल. 
  • आग्नेय दिशेला केशरी रंग किंवा लाल रंग वापरा किंवा त्या रंगाची वस्तू ठेवा. घरात पैसा खेळत राहील. 
  • दक्षिण दिशेचा लाल रंगाची वस्तू ठेवल्याने मनःशांती मिळेल. आत्मविश्वास आणि समाधान वाढेल. 
  • नैऋत्य दिशेला ठेवलेली तिजोरी ईशान्य दिशेला उघडत असेल तर घरातली लक्ष्मी स्थिर राहील. 
  • देवघरात श्रीयंत्र,  कनकधारा यंत्र, महालक्ष्मी यंत्र, त्रिपुरसुंदरी यंत्र यापैकी कोणतेही एक यंत्र ठेवले पाहिजे. श्रीयंत्रावर शुक्रवारी कुंकुमार्चन म्हणजे कुंकुमाचा अभिषेक करा. श्रीसूक्त म्हणा. घरातली लक्ष्मी संवर्धित होईल. 
  • तुळशीचे झाड आठही दिशेला ठेवले तरी मान्य आहे. परंतु उत्तर ईशान्य दिशेला ठेवलेले तुळशी रोप अधिक लाभदायक ठरते. त्या मातीत गोमती चक्र घालावे. त्यामुळे देखील लक्ष्मीचा घरात वास राहतो. 
  • घराच्या उत्तर पूर्व दिशेला धबधबा, नदी, समुद्र असे जलस्रोत असणारे चित्र लावले किंवा फिशटँक ठेवला तरीदेखील आर्थिक स्थिती मजबूत होते. 
  • दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम दिशेला खड्डा किंवा पाणी असता कामा नये, अन्यथा आर्थिक हानी होते. 
  • घराच्या नैऋत्य दिशेला भगवान विष्णूंची शेषशय्येवर पहुडलेली प्रतिमा ठेवल्यास नवरा बायकोचे नाते सुधारते आणि आर्थिक स्थिती सुधारते. 
  • घरात अडगळ ठेवता कामा नये. तसेच भिंतींना तड गेली असेल, पाण्याचे नळ बिघडले असतील तर त्यांची वेळोवेळी डागडुजी करून घ्यावी. 
  • मिठाच्या पाण्याने किंवा गोमूत्र टाकून फरशी पुसावी. वर्षातून एकदा तरी घरात यज्ञ याग करावा. 
  • घरात सकारात्मक विचार करावेत. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये. तुम्ही जे बोलाल तेच उलटून तुम्हाला भोगावे लागेल. वास्तू तथास्तु म्हणत असते. त्यामुळे तुम्ही चांगलंच बोलण्याची सवय लावून घ्या. 
  • जेवढं दुसऱ्याला द्याल, तेवढं तुमच्या घराला परत येईल. लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. 
  • घराच्या पश्चिम दिशेला वरुण आणि त्रिपुरभैरवी यंत्र लावावे. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांची माफी मागावी. 
  • कुलधर्म, कुलाचार पाळावेत आणि पितरांचे श्राद्ध करावे. त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटांना आळा बसेल. 
  • अशारितीने तुमच्या प्रयत्नांना वास्तू शास्त्राची जोड मिळाली तर लक्ष्मी माता घरी येईलही, धनवृद्धी होईलही आणि आयुष्य आनंदी होईल!

Web Title: Vastu Shastra: Use Special Vastu Tips to Make Your Vastu Make More Money and Last Longer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.