Vastu Shastra: नवीन घर घेताना कोणत्या वास्तूटिप्स फॉलो करायला हव्यात? मिळवा मोफत मार्गदर्शन आज दुपारी लोकमत भक्तीवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:49 AM2022-08-12T10:49:31+5:302022-08-12T10:49:59+5:30
Vastu Tips: भाड्याचे घर असो किंवा नवे कोरे घर, त्या वास्तूत प्रवेश करण्याआधी जाणून घ्या त्याचे नियम आज दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!
वास्तूशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर अप्रत्यक्षपणे प्रभाव पडत असतो. अनेक अडचणींवर आपण बाह्य उपाय शोधत राहतो, पण अनेकदा मेख आपल्या घरातच असते, हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यासाठी वास्तू शास्त्राचा अभ्यास असावा लागतो. या विषयाचे आपण जाणकार नसलो, तरी जाणकारांकडून या विषयाचे वेळोवेळी ज्ञान घेणे सहज शक्य आहे. त्यासाठी लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर दर शुक्रवारी दुपारी ३ वाजता वास्तुतज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळवा.
आज अर्थात १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव नव्या वास्तू खरेदी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. नवीन वास्तू घेताना आपण वरवरच्या जुजबी गोष्टी पाहून घेतो, परंतु त्याचबरोबरीने ती वास्तू वास्तुशास्त्राच्या नजरेतून बघणेही आवश्यक ठरते. अन्यथा त्या वास्तूत राहायला गेल्यानंतर अडचणी येतात आणि नंतर बदल करून घेणे क्लेशदायक होते. म्हणून वास्तुप्रवेश करण्यापूर्वीच नव्या वास्तूचे अंतरंग समजून घ्यावेत. आवश्यक बदल करावेत. ते शक्य नसतील तर त्यावर पर्याय शोधून, व्यवस्था करून मगच वास्तुप्रवेश करावा.
नवी वास्तू हे नव्या कोऱ्या वास्तूबद्दल बोलतोय असे नाही, तर काही काळासाठी आपण भाडे देऊन राहणार असू किंवा दुसऱ्याने वापरलेले अर्थात रिसेलचे घर देखील खरेदी केल्यावर आपल्यासाठी नवेच असते. म्हणून त्या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करताना कोणती खबरदारी घ्यावी, ते जाणून घ्या आज दुपारी ३ वाजता, लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!