Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:34 PM2024-09-18T15:34:11+5:302024-09-18T15:34:29+5:30

Vastu Shastra: मोहरीचा स्वयंपाकघरातला वापर आपण जाणतोच, वास्तुसाठी त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते पाहू.

Vastu Shastra: With salt mustard you can protect your house; Read Vastu Tips! | Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!

Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!

दृष्ट काढणे हा श्रद्धेचा भाग आहे, त्यासाठी फुलांचा, पाण्याचा किंवा मीठ-मोहरीचा वापर केला जातो. इथे आपण वास्तुदोष निवारणासाठी मोहरीचा वापर कसा करून घेता येईल, एकार्थी घराची दृष्ट कशी काढता येईल ते पाहू. घराची आर्थिक परिस्थितीही मुख्य दरवाजाशी संबंधित आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची ठेवलेल्या गोष्टी योग्य असतील तर घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि नसेल तर नकारात्मक गोष्टींचे प्राबल्य वाढते. त्यामुळे प्रवेश द्वाराजवळ मोहरीचा उपयोग कसा करून घेता येईल ते पाहू. 

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तींचा प्रभाव असतो. अशा वेळी घरात सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून वास्तू शास्त्राने दिलेले उपाय कसे आणि कधी करायचे ते जाणून घेऊ. जेणेकरून घरातील सदस्यांचे आरोग्य तर चांगले राहीलच, शिवाय आर्थिक स्थिती देखील डगमगणार नाही. 

धनप्राप्तीसाठी घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा चमचाभर मोहरी:

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी असे सांगितले आहे. काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपायांपासून दूर ठेवते. प्रगतीचे नवे मार्ग खुले करते. 

वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहेत. लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते, तर  काळी मोहरी शनिशी संबंधित मानली जाते. मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याने कोणते लाभ होतात? तर -

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे, चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते. कुंडलीतील रवी दोष दूर होतो आणि यशप्राप्ती होते. 

तर प्रवेश द्वाराजवळ काळी मोहरी ठेवल्याने शनिदोषापासून आराम मिळतो. घरातील आर्थिक स्थितीच्या आड येणारे दोष दूर होतात. आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ लागते आणि एखाद्याला कर्ज, गरिबी, अतिरिक्त खर्च, पैशाची हानी इत्यादीपासून मुक्ती मिळते.

( सदर माहिती वास्तू शास्त्रातील प्राथमिक तोडग्यांच्या आधारावर दिलेली आहे. )

Web Title: Vastu Shastra: With salt mustard you can protect your house; Read Vastu Tips!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.