Vastu Shstra: श्री यंत्राच्या पूजेने लक्ष्मी मातेचे स्थैर्य घरात राहते; त्याबद्दल सविस्तर माहिती मिळवा लोकमत भक्ती युट्युबवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 02:48 PM2022-09-30T14:48:03+5:302022-09-30T14:48:24+5:30
Vastu Tips: नवरात्र सुरु आहे त्यात श्री यंत्राची पूजा करून त्याची उपासना कशी करावी हे आज दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती युट्युबवर जाणून घेऊ!
नवरात्रीचे नऊ दिवस आपण आदिशक्तीची उपासना करतो. त्या पूजेने घरात सकारात्मकतेने वातावरण निर्माण होते आणि ती ऊर्जा वर्षभर पुरते. हे नैमित्तिक कारण असले तरी आपल्या संस्कृतीने शक्ती पूजा कायमस्वरूपी करा असे सांगितले आहे. यासाठीच आपण देवघरात अन्नपूर्णेच्या मूर्ती बरोबरच श्री यंत्राची देखील पूजा करतो. श्री अर्थात लक्ष्मी. ती चंचल न राहता आपल्या घरात कायम राहावी म्हणून तिची पूजा. मात्र त्याबरोबरच त्याच्याशी संबंधित काही नियमही पाळावे लागतात.
श्री यंत्रामुळे वास्तूमध्ये भरभराट होते हे आपण ऐकून आहोत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता लोकमत भक्ती च्या युट्युब चॅनेलवर वास्तू तज्ञ डॉ. रविराज अहिरराव आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याबद्दल रीतसर माहिती घेऊन आपल्याला आपल्या वास्तूत काय बदल केले पाहिजेत ते जाणून घेऊया आणि लक्ष्मी व सरस्वती रूपातील देवीला आपल्या घरी कायमचे वास्तव्य कर म्हणून आवाहन करूया.
अधिक माहितीसाठी चुकवू नका लोकमत भक्ती युट्युब चॅनेल, ३० सप्टेंबर दुपारी ३ वाजता!