Vastu Tips : सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी 'या' वास्तूटिप्सचा उपयोग नक्की करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 05:15 PM2022-04-26T17:15:32+5:302022-04-26T17:16:13+5:30

Vastu Tips: कौटुंबिक सुखासाठी येथे वास्तुशास्त्रज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे कौटुंबिक जीवन सुखी होईल. या सोप्या उपायांचा अवलंब करून तुमची वास्तू आनंदात ठेवण्यासाठी जरूर प्रयत्न करा. 

Vastu Tips: Definitely try these Vastu Tips for a happy and married life! | Vastu Tips : सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी 'या' वास्तूटिप्सचा उपयोग नक्की करून बघा!

Vastu Tips : सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी 'या' वास्तूटिप्सचा उपयोग नक्की करून बघा!

googlenewsNext

घरात आणि जीवनात अनेक समस्या येतात, पण कधी कधी त्या इतक्या वाढतात की जगणे कठीण होऊन बसते. तुम्हालाही तुमच्या कुटुंबात अशी कोणतीही समस्या भेडसावत असेल तर हे उपाय तुम्हाला खूप उपयोगी पडतील. 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कुटुंब महत्त्वाचे असते. सुखी आणि समृद्ध कुटुंबात राहण्याची इच्छा कोणाला नाही? कुटुंबात सुख-शांती राहावी यासाठी प्रत्येक व्यक्ती विविध उपाय करतो. कौटुंबिक सुखासाठी येथे वास्तुशास्त्रज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे कौटुंबिक जीवन सुखी होईल. या सोप्या उपायांचा अवलंब करून तुमची वास्तू आनंदात ठेवण्यासाठी जरूर प्रयत्न करा. 

वास्तुशास्त्राचे उपाय : 

>>रात्री झोपताना पलंगाच्या शेजारी थोडे पाणी ठेवा. तेच पाणी आड वळणावरच्या मोठ्या झाडाला टाकावे. यामुळे घरातील भांडणे, अपमान, रोग, द्वेष किंवा इतर कोणत्याही वाईट गोष्टींपासून नेहमीच संरक्षण मिळेल.

>>आपण जेवणाआधी एक नैवेद्य जसा देवाला ठेवतो, तसा आणखी काही भाग गाय, कावळा, कुत्रा यांच्यासाठी बाजूला ठेवावा. त्यांच्या रूपाने सर्व जीवात्मा तृप्त होऊन कौटुंबिक सुख-शांती लाभते.

>>प्रत्येक सोमवारी गंगाजलमिश्रित पाण्याने शिवाला अभिषेक करावा. त्याची व्यवस्थित पूजा केल्यानंतर १०८ वेळा ओम नमः शिवाय जप करावा. असे केल्याने वैवाहिक जीवनात सुसंवाद राहतो.

>>ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात मतभेद आहेत त्यांनी रोज सुंदरकांडचा पाठ करावा. शुक्ल पक्षातील कोणत्याही मंगळवारपासून सुंदरकांडाचा पाठ सुरू करता येतो.

>>प्रदोषाच्या दिवशी गुळाचे शिवलिंग बनवून त्याची यथायोग्य पूजा करा आणि ते शिवलिंग दान करा. असे केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.

>>'सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते' रोज या मंत्राचा एक जप केल्याने कौटुंबिक नात्यात मधुरता वाढते.

>>ज्या महिलांना वैवाहिक सुखात स्थिरता हवी आहे, त्यांनी यासाठी गुरुवारी व्रत पाळावे. व्रताच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी. गूळ आणि हरभरा अर्पण करून भगवान विष्णूची पूजा करावी आणि पिवळे फूल अर्पण करावे. असे केल्याने वैवाहिक जीवनात सुखाचा वर्षाव होईल. 

Web Title: Vastu Tips: Definitely try these Vastu Tips for a happy and married life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.