Vastu Tips: घरातील देवघरात 'या' सात चुका टाळा; लक्ष्मी देवी होईल नाराज, अवकृपा संभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:24 PM2022-12-05T15:24:01+5:302022-12-05T15:24:21+5:30

वास्तूशास्त्रानुसार देवघर घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावं असं सांगितलं जातं.

vastu tips do not keep these things in house temple | Vastu Tips: घरातील देवघरात 'या' सात चुका टाळा; लक्ष्मी देवी होईल नाराज, अवकृपा संभव!

Vastu Tips: घरातील देवघरात 'या' सात चुका टाळा; लक्ष्मी देवी होईल नाराज, अवकृपा संभव!

googlenewsNext

वास्तूशास्त्रानुसार देवघर घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावं असं सांगितलं जातं. घरात देवघर योग्य दिशेला असणं फार गरजेचं आहे. कारण देवघरच एक अशी गोष्ट आहे की तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण करणारं स्त्रोत आहे. देवघरात जर दोष असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. मान्यतेनुसार देवघराची योग्य दिशा आणि देवघरातील मूर्तींची दिशा याबाबतचं ज्ञान असणं देखील महत्वाचं आहे. वास्तूशास्त्रानुसार जर देवघर योग्य दिशेला नसेल तर तुम्ही एकाग्रतेनं पूजा-अर्चा करू शकत नाही. तसंच इच्छित फळही प्राप्त होत नाही असं म्हणतात. त्यामुळे देवघराबाबतच काही वास्तूटिप्स आहेत ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे. 

१. वास्तूशास्त्रानुसार देवघर योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. जर देवघर योग्य दिशेला नसेल तर लाभ प्राप्त होत नाही. देवघर नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावं. वास्तूशास्त्रानुसार दक्षिण किंवा पश्चिम दिशा अशुभ मानली जाते. तसंच देवघरात दोन शंख एकत्र कधीच ठेवू नयेत. 

२. वास्तूशास्त्रानुसार देवघरात कधीही तडा गेलेल्या मूर्तीची स्थापना करू नये. कारण ते अशुभ मानलं जातं. इतकंच नव्हे, तर तडा गेलेल्या मुर्तीची पूजा केल्यानं देवता नाराज होतात असं म्हटलं जातं. 

३. वास्तूनुसार देवघर कधीच स्टोअररुम, बेडरुम आणि बेसमेंटमध्ये नसावं. देवघर नेहमी खुल्या जागेत असावं. 

४. देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत. तसंच देवघरात गणपतीच्या तीन मूर्ती किंवा फोटो असू नयेत. कारण यामुळे शुभ कार्यात अडचणी येतात. तसंच मुर्ती आणि फोटो योग्य दिशेला ठेवण्याचंही ज्ञान असणं गरजेचं आहे. 

५. देवघरात भगवान हनुमानाची जास्त मोठी मूर्ती ठेवू नये. भगवान हनुमानाची नेहमी छोटीशी मूर्ती असावी. तसंच बजरंगबलीची बैठी मूर्ती असणं शुभ मानलं जातं. यासोबतच शिवलिंग देखील देवघरात असायला हवं. 

६. देवघराजवळ कधीच शौचालय बनवू नका. अनेकदा बरेच लोक स्वयंपाक घरात देवघर बनवतात. पण वास्तू नियमांनुसार स्वयंपाक घरात देवघर असू नये. असं केल्यानं देवी लक्ष्मी नाराज होते. 

७. देवघरात देवी-देवतांच्या नेहमी हास्यभाव असणाऱ्या प्रतिमा ठेवाव्यात. क्रोधीत रुपातील फोटो किंवा मूर्ती ठेवू नये ते अशुभ मानलं जातं. 

Web Title: vastu tips do not keep these things in house temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.