Vastu Tips: तुमच्या घरी सायंकाळी 'या' चुका तर घडत नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:11 PM2024-11-20T17:11:39+5:302024-11-20T17:12:34+5:30
Vastu Tips: सायंकाळी दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ मानली जाते, या काळात कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घ्या!
वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास आयुष्य कमी कष्टदायी होते. वास्तु टिप्समध्ये सांगितल्याप्रमाणे काही कामे सूर्यास्तानंतर करू नयेत. त्यामागे असलेली कारणे जाणून घेतली तर आपणही त्या नियमांचे पालन अवश्य कराल. मात्र जाणून बुजून केलेल्या कामांचा विपरीत परिणाम तुमच्यासह कुटुंबालाही भोगावा लागतो असे वास्तू शास्त्रात म्हटले आहे.
सनातन धर्मात रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्थात दोन पळी पाणी सूर्याच्या दिशेने सोडून त्याला नमस्कार करून, कृतज्ञता व्यक्त करावी. हे शास्त्र जसे सकाळी पाळायचे, तसे काही नियम सूर्यास्ताच्या वेळीही पाळायचे असे वास्तू शास्त्र सांगते.
या गोष्ट करू नका
>> असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ ठिकाणीच वास करते. त्यामुळे घराच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घर झाडू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात मुक्काम करत नाही. परिणामी आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच घरात नकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे संध्याकाळी केर काढू नये.
>> तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. या रोपाला रोज सकाळी पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. मात्र सायंकाळी तुळशीची पाने तोडू नये. तसेच सूर्यास्तानंतर कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नये.
>> याशिवाय सायंकाळी घराच्या प्रवेश द्वारावर, ओट्यावर बसू नये. अर्थात लक्ष्मीचा मार्ग अडवू नये. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच रात्री केस कापू नये, नखं देखील संध्याकाळी कापू नये.या नकारात्मक गोष्टी तसेच स्वच्छतेशी निगडित गोष्टी दिवसा कराव्यात असे शास्त्र सांगते. अन्यथा या गोष्टी नकारात्मक रित्या आपल्यावर उलटू शकतात.