Vastu Tips: घरात पितळी कासव आणून ठेवले तरी धनलाभाची चिन्हं नाहीत? 'या' चुका टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:30 IST2025-02-05T12:30:14+5:302025-02-05T12:30:41+5:30
Vastu Tips: फेंगशुई वास्तू शास्त्रानुसार घरात पितळी कासव आणल्याने आर्थिक स्थिती सुधारते; पण तुमच्या बाबतीत हे घडत नसेल तर दिलेले बदल करा.

Vastu Tips: घरात पितळी कासव आणून ठेवले तरी धनलाभाची चिन्हं नाहीत? 'या' चुका टाळा!
येनकेनप्रकारेण वास्तू आणि वास्तूमधील सदस्य आनंदात राहावीत यासाठी आपण जे जे शक्य ते ते उपाय करतो. वास्तू दोष घालवण्यासाठी दर वेळी तोड फोड केली पाहिजे असे नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केले तरी मोठे परिणाम मिळू शकतात.
अलीकडच्या काळात भारतीय वास्तू शास्त्राने फेंगशुई वास्तू पद्धत स्वीकारल्यामुळे बाजारात या शास्त्राशी संबंधीत लाफिंग बुढ्ढा, मनी प्लांट, सॅण्ड म्युझिक, पितळी कासव, पारदर्शक मासा, पिरॅमिड अशा अनेक वस्तू बघायला मिळतात. आपण त्या आणतो, पण ते ठेवण्याची दिशा आणि पद्धतच चुकीची असेल तर उपयोग होणार नाही. आजच्या लेखात आपण पितळी कासव घरात ठेवल्याने होणारे फायदे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा ते जाणून घेऊया.
पितळी कासव घराच्या योग्य दिशेला स्थापित केल्यास घरामध्ये सकारात्मकता राहते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते आणि आर्थिक स्थितीही सुधारते.
पितळी कासव ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि जागा :
- वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला पितळी कासव ठेवावे.
- जर क्रिस्टल कासव असेल तर ते घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे.
- पितळी कासव घरातील अशा ठिकाणी ठेवा, जिथे तुमचा वावर जास्त असेल.
- कासवाचे तोंड घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा.
- जर तुम्ही देवघराजवळ कासव ठेवत असाल तर कासवाचे तोंड मंदिराकडे असावे.
- घराच्या ईशान्य दिशेला कासव ठेवल्याने कुटुंबात शांती, समृद्धी आणि सुख-समृद्धी राहते. घरातील वातावरण सकारात्मक राहील
कासव पाण्यात ठेवल्याने मिळणारे लाभ :
>>ज्याप्रमाणे कासव पाण्यात आणि जमिनीवर राहू शकते, पण पाण्यात पोहताना त्याला गती मिळते, ते पाहता फेंगशुई वास्तू शास्त्राने पितळी कासव पाण्यात ठेवा असे सांगितले आहे.
>>पितळी कासव पाण्यात ठेवल्यास शुभ परिणाम मिळू शकतात.
>> पाणी किती? तर त्याचे पाय ओले राहतील एवढेच!
>>पितळी असले तरी ते कासव स्वच्छ ठेवा आणि दररोज पाणी बदला.
>>घरात साचलेले पाणी स्वच्छ राहिल्यास रोगराई पसरणार नाही.