Vastu Tips: घरात कुत्रा, मांजर पाळा, पण पोपट? वास्तू नियम वाचा आणि मगच निर्णय घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 01:03 PM2024-06-06T13:03:49+5:302024-06-06T13:06:11+5:30
vastu shastra: वास्तू शास्त्राच्या नियमानुसार घरात पाळीव प्राण्यांमध्ये पोपटाचा समावेश करावा की नाही यासंबंधी नियम जाणून घेऊ.
ऋषीमुनींच्या आश्रमापासून ते आताच्या शहरी, ग्रामीण घरापर्यंत पाळीव प्राणी ही संकल्पना घरोघरी रुजली आहे, पण त्यात पोपटाचा समावेश करावा की नाही, याबाबत वास्तू शास्त्राचे नियम काय सांगतात, ते पाहू.
लोकांना त्यांच्या घरात विविध प्रकारचे प्राणी ठेवायला आवडतात. कोणी मांजर पाळतात तर कोणी कुत्रा. त्याचप्रमाणे अनेकजण घरी पोपट पाळतात. असे मानले जाते की घरात पाळीव प्राणी ठेवल्याने सकारात्मकता कायम राहते.तर अनेक लोक त्यांच्या एकटेपणावर मात करण्यासाठी प्राणी पाळतात.
वास्तुशास्त्रामध्ये अनेक प्राणी आणि पक्षी शुभ किंवा अशुभ चिन्हांशी संबंधित आहेत. यापैकी एक पोपट आहे. अनेकांना घरी पोपट पाळणे आवडते. अशा परिस्थितीत वास्तुनुसार घरात पोपट ठेवणे शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊया. जर तुम्ही पोपट पाळत असाल तर घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी कोणते नियम लक्षात ठेवावेत? तेही पाहा!
पोपट पाळणे शुभ की अशुभ?
वास्तूनुसार, घरात पोपट पाळणे खूप शुभ मानले जाते, कारण पोपट पाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, ज्यामुळे कुटुंबात आनंदही कायम राहतो. पण पोपट पाळताना काही वास्तु नियमही लक्षात ठेवले पाहिजेत.
पोपट ठेवण्यासाठी योग्य दिशा
जर तुमच्या घरातही पोपट असेल तर वास्तूनुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला त्याचा पिंजरा ठेवावा. कारण उत्तर दिशा ही बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक असलेल्या बुध ग्रहाची दिशा मानली जाते. अशा स्थितीत उत्तर दिशेला पोपट ठेवल्यास त्याच्या माध्यमातून घराला परिणाम मिळतात. तर पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते आणि या दिशेने घरात सुख-समृद्धी येते. त्यामुळे त्यादिशेने पिंजरा लट्कवून ठेवल्याने फायदे होतात.
या गोष्टी लक्षात ठेवा
पिंजऱ्यात पोपट ठेवला तर पोपट आनंदी राहिला पाहिजे हे लक्षात ठेवा. कारण अनेक मान्यतेनुसार पोपट पिंजऱ्यात खूश नसतो आणि जेव्हा असे होते तेव्हा घरात नकारात्मकता वावरू लागते.