Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवा कामधेनूची मूर्ती, होईल समस्त इच्छांची पूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 04:45 PM2022-06-25T16:45:17+5:302022-06-25T16:46:01+5:30

Vastu Shastra: हिंदू धर्मात अशा काही पवित्र गोष्टी आहेत, ज्यांचा योग्य वापर केल्याने आणि त्या योग्य दिशेने ठेवल्याने माणसाला समृद्धी, संतती आणि आरोग्य लाभ होतात. या लेखात जाणून घेऊया कामधेनूची अर्थात गायीची मूर्ती ठेवण्याचे लाभ!

Vastu Tips: Keep the idol of Kamadhenu in the house according to Vastu Shastra, all desires will be fulfilled! | Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवा कामधेनूची मूर्ती, होईल समस्त इच्छांची पूर्ती!

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवा कामधेनूची मूर्ती, होईल समस्त इच्छांची पूर्ती!

googlenewsNext

पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. कामधेनू गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सुख, समृद्धी आणि संततीचा लाभ होतो. तसेच घरात सकारात्मकता राहते. म्हणून वास्तुशास्त्राने घरात गायीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी असा आग्रह धरला आहे. फक्त ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती ते जाणून घेऊ. 

गावाकडे ज्या घराच्या बाहेर गोठा असतो अशा घरात सुबत्ता नांदत असते. शहरात तसे करणे शक्य नाही. त्यावर उपाय आहे मूर्ती किंवा प्रतिमेचा! वास्तु तज्ज्ञांच्या मते, कामधेनू योग्य दिशेने ठेवल्यास अनेक फायदे होतात. असे मानले जाते की ज्या घरात कामधेनू गाईचे वासराचे छायाचित्र लावले जाते ते घर सुखाने भरलेले राहते. वासरासह कामधेनू गाईचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

असे मानले जाते की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास फायदा होतो.

- घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम (नैऋत्य) दिशेला लावा. लवकरच फायदा होईल.

- घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात. स्त्री आनंदित असेल तर कुटुंबही आनंदी राहते. 

- वास्तु तज्ज्ञांच्या मते, घराच्या पूर्व दिशेला गाईचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते. घरात लक्ष्मी वास करू लागते. 

- उत्तर-पूर्व दिशेला गायीची वासरासह असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते. 

- घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते.

- पश्चिम कोनात गायीचा फोटो ठेवल्यामुळे घरातील वातावरण अनुकूल राहते. व्यक्तीचे उत्पन्न वाढते. आध्यात्मिक वातावरण तयार होते. 

- घरात मुले नसतील किंवा मुले मान देत नसतील तर कामधेनू गाईचे चित्र ईशान्य कोपर्‍यात लावावे आणि नंतर नियमित प्रार्थना करावी.

- घरातील धन आणि अन्नाची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता कायम ठेवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला कामधेनूचे चित्र लावावे.

- त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल तर गोमातेचा फोटो दक्षिण दिशेला लावावा. लवकरच फायदा होईल.

Web Title: Vastu Tips: Keep the idol of Kamadhenu in the house according to Vastu Shastra, all desires will be fulfilled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.