Vastu Tips : घरातील इतर वस्तूंप्रमाणे देवघराचीही दिशा योग्यच निवडा, वाचा वास्तू शास्त्राचे नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:43 PM2022-05-19T17:43:31+5:302022-05-19T17:43:56+5:30

Vastu Tips: तुम्हाला घरात दोष जाणवत असतील, कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे असे जाणवत असेल, तर देव्हाऱ्याची जागा बदलून पहा व पुढील चूका टाळा.

Vastu Tips: Like other objects in the house, choose the direction of the temple, read the rules of Vastu Shastra! | Vastu Tips : घरातील इतर वस्तूंप्रमाणे देवघराचीही दिशा योग्यच निवडा, वाचा वास्तू शास्त्राचे नियम!

Vastu Tips : घरातील इतर वस्तूंप्रमाणे देवघराचीही दिशा योग्यच निवडा, वाचा वास्तू शास्त्राचे नियम!

googlenewsNext

आपली रोजची सकाळ देवदर्शनाने होते. देवाचा निरोप घेऊन आपण कामाची सुरुवात करतो. हिंदू घरांमध्ये देव्हारा नाही, असे होत नाही. सगळे जण आपापल्या सोयीप्रमाणे घरात देव्हाऱ्याची रचना करतात किंवा जागेचा अभाव असेल, तर देवी-देवतांची फोटो फ्रेम लावतात आणि त्याची पूजा करतात. परंतु, अजाणतेपणी आपल्याकडून देव्हाऱ्याची जागा चुकते आणि  आपल्याला पूजेचा, देवदर्शनाचा आनंद मिळत नाही किंवा समाधान लाभत नाही. यासाठी फार बदल अपेक्षित नाहीत, फक्त दिशाबदल अपेक्षित आहे. हा बदल वास्तू शास्त्रानुसार सुचवलेला आहे. तुम्हालाही घरात दोष जाणवत असतील, कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे असे जाणवत असेल, तर देव्हाऱ्याची जागा बदलून पहा व पुढील चूका टाळा.

देवघर कुठे असावे ?

घर स्वत:चे असो नाहीतर भाड्याचे, छोटे असो किंवा मोठे, देवघर असलेच पाहिजे. कारण, या स्थळावर सर्व जण नतमस्तक होतात. देवघराची दिशा उत्तर पूर्व असल्यास शुभ मानली जाते. या दिशेने देवघर असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते. ईशान्य दिशेचे प्रमुख गुरु बृहस्पती हे अध्यात्मिक ज्ञान देतात. सकारात्मक ऊर्जेचा संचार याच दिशेने होते. वास्तुपुरूष जेव्हा धरतीवर आले, तेव्हादेखील त्यांचे शीर ईशान्य दिशेने होते. म्हणून देवघरासाठी ईशान्य दिशा महत्त्वाची ठरते. 

काही कारणास्तव ईशान्य दिशेने देवघर ठेवणे जमत नसेल, तर पूर्व दक्षिण दिशेचा वापर करावा. परंतु केवळ दक्षिण दिशेच्या दिशेने देवघर नसावे. कारण ती यमाची दिशा आहे. पूजा करताना व्यक्तिचे मुख पूर्व दिशेने असेल, तर पूजेचे पूर्ण फळ मिळते आणि पूजा संपन्न होते.

देवघर कुठे नसावे?

अनेकदा जागेच्या अभावामुळे आपण कोनाडा पाहून देवघर बनवून मोकळे होतो. तसे असले, तरीदेखील देवघराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आणि देवपूजेतून प्रसन्नता मिळण्याच्या दृष्टीने पुढील जागांची निवड प्रकर्षाने टाळावी. अशा ठिकाणी देवघर असेल, तर घरात अकारण क्लेष होतात, आर्थिक हानी होेते आणि कुटुंबप्रमुख नाखुष राहतो. 

>>शिडीच्या खाली देवघर असू नये.
>>शौचालयाच्या जवळपास देवघर असू नये. 
>>शयन कक्ष अर्थात बेडरूममध्ये देवघर असू नये.
>>घराची अडगडीची जागा, कोनडा, बेसमेंट, स्टाअर रूम अशा ठिकाणी देवघर करू नये. 

अशा रितीने देवघराची जागा निश्चित करून दिवसभरातून किमान पाच मिनीटे देवासमोर, देवाच्या सान्निध्यात घालवावीत, त्याचा लाभ तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना अवश्य मिळेल. 

Web Title: Vastu Tips: Like other objects in the house, choose the direction of the temple, read the rules of Vastu Shastra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.