Vastu Tips: पावसाळा सुरू झाला, कापुर जाळा डेंग्यूचा धोका टाळा; सोबत मिळवा अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 12:35 PM2024-07-08T12:35:31+5:302024-07-08T12:44:28+5:30

Vastu Shastra: पावसाळ्यात कापुर जाळल्याने केवळ वास्तुचे रक्षणच नाही तर वैयक्तिक लाभदेखील होतात, कोणते ते जाणून घ्या!

Vastu Tips: Monsoon has started, burn camphor; Avoid the risk of dengue and get the benefits of Vastu! | Vastu Tips: पावसाळा सुरू झाला, कापुर जाळा डेंग्यूचा धोका टाळा; सोबत मिळवा अनेक फायदे!

Vastu Tips: पावसाळा सुरू झाला, कापुर जाळा डेंग्यूचा धोका टाळा; सोबत मिळवा अनेक फायदे!

बदलत्या वातावरणात रोगराईचे प्रमाण वाढते. अशा वेळी घराला संरक्षण कवच द्यायचे असेल तर वास्तुशास्त्राने दिलेले उपाय नक्की करा. त्याचा निश्चितच लाभ होईल. ते उपाय पुढीलप्रमाणे... 

जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज संध्याकाळी कापूर जाळावा. असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो. वातावरण प्रसन्न होते. अपघात टाळण्यासाठी लोक हनुमानाच फोटो किंवा फेंग शुईच्या वस्तू त्यांच्या कारमध्ये लावतात. त्याचबरोबर कापराच्या वडीचाही वापर करता येईल. रात्री कापूर जाळून तुम्ही हनुमान चालीसा वाचा. वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरच्या दोन गोळ्या घरात ठेवा आणि ती विरघळली की पुन्हा दोन गोळ्या ठेवा. आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास हे घरातील वास्तू दोष दूर होतील.

  • लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे ६ तुकडे आणि ३६ लवंगाचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ आणि हळद मिसळा. देवी दुर्गेची आरती करून त्यात या वस्तू अर्पण करा. असे केल्याने लग्न लवकर ठरते असा अनेकांना अनुभव आहे.
  • ग्रहांच्या शांतीसाठीदेखील आपण कापूर वापरू शकता. तूपात भिजलेला कापूर दररोज सकाळ, संध्याकाळ आणि रात्री जाळावा.
  • कापूरच्या दोन गोळ्या घराच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवल्या पाहिजेत.
  • जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापूरचा दिवा लावावा आणि संपूर्ण घराभोवती फिरावे, त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे तुमची अतिरिक्त खर्चाची सवय कमी होईल.
  • जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही श्री यंत्रासमोर कापूर जाळून पूजा करावी. याद्वारे आपल्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होईल.
  • जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत दोन कपूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळच्या भांड्यात ठेवा. असे केल्यास घरात नकारात्मकता संपेल. आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तर आपण स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता.
  • जर आपल्या घरात वारंवार भांडण होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरची गोळी ठेवावी. यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल.
  • वैवाहिक जीवनात अडचणीअसतील, तर बेडरूम मध्ये कापराच्या दोन गोळ्या ठेवाव्यात. त्याच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल आणि आपले नातेही मधुर होईल.
  • दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात बुडवून ठेवा. मग त्यास घराभोवती फिरवा. असे केल्याने घरात सुख-शांती कायम राहते.

आता जाणून घेऊ आरोग्यासाठी असलेले फायदे

  • कापूर, ओवा आणि पेपरमिंट एक सारख्या प्रमाणात घ्या. त्यांना एका काजेच्या बाटली टाका. त्या बाटलीला उन्हात ठेवा. थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा. त्यानंतर त्यातील चार थेंब बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका. हे जुलाब झालेल्या व्यक्तीला द्या. जुलाब थांबतील.
  • पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे. पोटात दुखत असेल अशावेळी कापूर, ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोट दुखी नाहिशी होते.
  • त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे. कापूर कोशिकांना मजबूत करतो. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
  • स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापूरची मदत होते. स्नायू किंवा संधीवातचा आजार असल्यास कापूरचे तेलाने मालीश करा. आराम मिळू शकतो आणि दुखणे पळून जाते.
  • खाज आल्यास कापुराचा उपयोग करा. खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा, खाज बंद होते.
  • संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे. संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो.
  • जळले किंवा भाजल्यास कापूराचं तेल खूप उपयोगी आहे. त्याने आग कमी होते.
  • शरीराचा एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापराच्या तेलाने मसाज करा. असे केल्याने वेदना दूर होतील. सांधेदुखीपासूनही सुटका मिळवायची असेल तर कापराचा उपयोग केला जाऊ शकतो.
  • तुमच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात काहीवेळ पाय ठेवा.
  • जर तुम्हाला जखम झालेली असेल किंवा कापलेलं असेल तर कापरामध्ये पाणी मिश्रित करुन त्या जखमेवर लावा. कापरात अॅंटीबायोटिक असतं जे जखम भरण्यास मदत करतं.

Web Title: Vastu Tips: Monsoon has started, burn camphor; Avoid the risk of dengue and get the benefits of Vastu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.