Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार नवीन घरात प्रवेश केल्यावर प्रकर्षाने टाळा 'या' चुका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 02:20 PM2023-12-06T14:20:43+5:302023-12-06T14:21:10+5:30

Vastu Shastra: नवीन घरात नवीन आणि चांगले काही घडेल अशी अपेक्षा असताना काही विपरीत घडत असेल तर तो वास्तू दोष समजा आणि पुढील उपायांनी दूर करा.

Vastu Tips: Strictly avoid 'these' mistakes when entering a new house according to Vastu Shastra! | Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार नवीन घरात प्रवेश केल्यावर प्रकर्षाने टाळा 'या' चुका!

Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार नवीन घरात प्रवेश केल्यावर प्रकर्षाने टाळा 'या' चुका!

जेव्हा आपण नवीन घरात प्रवेश करतो तेव्हा त्या घराची आपण सर्वतोपरी काळजी घेतो. नव्या वास्तुमुळे प्रगतीची नवनवीन द्वारे खुली व्हावीत अशी आपली अपेक्षा असते. येणारा काळ आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येईल आणि नवीन घरात आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने, शांततेने आणि समाधानाने राहू अशी आपली अपेक्षा असते. या स्वप्नपूर्तीसाठी वास्तू शास्त्र आपल्याला काही चुका प्रकर्षाने टाळण्याचा सल्ला देते. त्याबद्दल जाणून घेऊया. 

नवीन वास्तूमध्ये गृह प्रवेश केल्यावर नोकरीत घट झाली, कुटुंबातील सदस्यांची तब्येत खराब झाली, सर्वजण अचानक चिडचिड होत असतील, आशीर्वादाची कमतरता जाणवत असेल, तर समजून घ्या की तुमच्या नवीन घरात नक्कीच काही वास्तुदोष आहे. हे वास्तू दोष आधीपासून होते असे नाही, अनेकदा आपल्या हातून कळत नकळत झालेल्या चुकांमुळेदेखील वास्तू दोष उद्भवतो. कसा ते पाहू. 

>>नवीन घरात आल्यानंतर जर कुटुंबातील कोणी आजारी पडू लागले तर जेवल्यानंतर त्यांना गुळाचा खडा चघळायला द्यावा. आजार बरा होईपर्यंत हा उपाय करावा. 

>>घरात वास्तू दोषाची लक्षणे दिसत असतील तर दारं खिडक्यांना पिवळे पडदे लावा आणि घराच्या कानाकोपऱ्यात हळदीचे पाणी शिंपडा, जेणेकरून वास्तू दोष दूर होईल आणि कुटुंबाची भरभराट होईल. 

>>वास्तू दोष टाळण्यासाठी गरजू व्यक्तीला पांढरा तांदूळ, कापूर इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे दान करा. सलग चार रविवारी हा उपाय करावा. 

>>सकाळी सूर्यप्रकाश घरात येणं खूप गरजेचं आहे. जर घरात अंधार असेल तर तो देखील दोषाच्या श्रेणीत येतो आ>>णि रोग आणि दुःख निर्माण करतो. त्यासाठी वास्तू रचनेत आवश्यक बदल करा आणि चार शनिवारी मूठभर मसूर रात्री दाराबाहेर ठेवून सकाळी फेकून द्या. 

>>घरातील आजारपण कमी होत नसेल तर कुलदेवीला खिरीचा नैवेद्य दाखवून ती खीर गरजूंना दान करा. मंगळवार तसेच शुक्रवारी हा उपाय केला असता लाभ होतो. 

>>जर तुमची मुले तुमचे ऐकत नसतील किंवा अभ्यास करत नसतील तर तुमच्या मुख्य दरवाजावर तांब्यावर बनवलेले सूर्य यंत्र स्थापित करा, तसेच तुमच्या पूजेच्या ठिकाणी सूर्य यंत्र स्थापित करा आणि मुलांसोबत त्याची पूजा करा.

>>नवीन घरात आल्यावर जर तुम्हाला निद्रानाशाची तक्रार असेल तर हळदीचे पाच तुकडे पिवळ्या कपड्यात बांधून झोपताना उशीजवळ ठेवा. 

>>घरातील झाडे सुकत असतील किंवा फुले येत नसतील, तुळस कोमेजत असेल, तर कुंडीच्या तळाशी पांढरा तांदूळ, कापूर ठेवा आणि कुंडीभोवती थोडे तांदूळ टाकून थोडे थोडे पाणी टाकत राहा. 

>>नवीन घरात जाताच नोकरीत समस्या निर्माण झाल्या असतील तर शनिवारी गरजू व्यक्तीला मोहरीचे तेल दान करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावा.

>>नवीन वास्तूमध्ये अकारण वाद होत असतील तर तांब्याची वस्तू दान करा, नारळ वाहत्या पाण्यात सोडा. 

>>स्वस्तिक यंत्र घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर ठेवा.

>>गणेशाची मूर्ती मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा

>>ईशान्य कोपऱ्यात तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा, त्यावर एक वाटी ठेवा. ते पाणी नकारात्मकता शोषून घेईल. 

>>घरामध्ये वास्तु दोष निर्मूलन यंत्र बसवा.

>>लाफिंग बुढ्ढा, कासव आणि सोनेरी मनी प्लांट घरात लावा.

>>दररोज लादी पुसताना मीठ टाकलेल्या पाण्याने घर पुसून टाका. वास्तू दोष दूर होईल. 

Web Title: Vastu Tips: Strictly avoid 'these' mistakes when entering a new house according to Vastu Shastra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.