Vastu Tips: कर्जाच्या ओझ्याने त्रस्त आहात? वास्तुशास्त्राने सांगितलेले उपाय ठरतील लाभदायी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 04:14 PM2024-03-11T16:14:36+5:302024-03-11T16:14:57+5:30

Vastu Shastra: आर्थिक अडचण असेल तरच आपण कर्ज घेतो, पण ते वेळेत फेडता आले नाही तर मनावर ताण येतो, म्हणून प्रयत्नांना जोड द्या वास्तू टिप्सची!

Vastu Tips: Suffering from debt burden? Vastu Shastra's solutions will be beneficial! | Vastu Tips: कर्जाच्या ओझ्याने त्रस्त आहात? वास्तुशास्त्राने सांगितलेले उपाय ठरतील लाभदायी!

Vastu Tips: कर्जाच्या ओझ्याने त्रस्त आहात? वास्तुशास्त्राने सांगितलेले उपाय ठरतील लाभदायी!

कर्जात बुडालेली व्यक्ती सतत दडपणाखाली वावरत असते. आपण कोणाचे देणं लागतो, ही टोचणी आयुष्याचा आनंद घेऊ देत नाही. कर्जबाजारी असलेली व्यक्ती पहिले कर्ज फेडत नाही, तोवर तिच्यासमोर दुसरे कर्ज घेण्याची वेळ येते. म्हणून कर्जातून सुटका मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 

कर्ज घेण्याची वेळ आपल्यावर यावी असे कोणालाच वाटत नाही. परंतु मनुष्य परिस्थितीमुळे हवालदिल होतो. कर्ज घेतो. परंतु आर्थिक अडचणींमुळे कर्जाच्या चक्रव्यूहात अडकून जातो. कर्ज मुक्तीत हातभार लागावा म्हणून वास्तूशास्त्राने काही उपाय सुचवले आहेत. 

>>आपल्या घराचे स्नानगृह दक्षिण पश्चिम दिशेला नाही ना, हे एकदा तपासून घ्या. वास्तुशास्त्रानुसार या दिशेने असलेले स्नानगृह घरात येणारी पैशांची आवक पाण्यासारखी वाहून नेते. स्नानगृह या दिशेने असू नये याची काळजी वास्तू बांधण्यापूर्वी आपण घेऊ शकतो. परंतु बांधलेली वास्तू आपण मोडू शकत नाही. म्हणून त्यावर उपाय हा, की तुमचे स्नानगृह दक्षिण पश्चिम दिशेला असेल, तर स्नानगृहात एक वाटी मीठ कर्जमुक्ती होईपर्यंत ठेवून द्या. त्यामुळे वास्तू दोष दूर होतो. 

>>वास्तू शास्त्राअनुसार तुम्ही कर्ज घेतले आहे आणि ते फेडण्याचा प्रयत्न करत आहात, तर कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारी फेडा. त्यामुळे उर्वरित कर्ज फेडण्याला गती मिळते. 

>>घरात दुकानात लावलेला आरसा शक्यतो उत्तर पूर्व दिशेने लावा. त्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येत नाही. 

>>जेवण झाल्यावर उष्टी-खरकटी भांडी फार काळ ठेवू नका. 'असतील शिते तर जमतील भुते' ही म्हण आपल्याला माहित आहेच. त्यानुसार खरकट्या भांड्यांकडे नकारात्मक ऊर्जा खेचली जाते. त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि आर्थिक स्थिती ढासळत जाऊन कर्ज घेण्याची वेळ येते. 

>>घरात किंवा दुकानात उत्तर दिशेला देवी लक्ष्मी किंवा कुबेराचा फोटो लावून त्याची नियमित पूजा करा. त्यामुळेही कर्जमुक्ती होण्यास मदत होते. 

>>सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कर्जाची खरी आवश्यकता ओळखा. आपले पूर्वज आपल्याला नेहमी शिकवत असत, अंथरूण पाहून पाय पसरावे. अर्थात आपली क्षमता ओळखून खर्च करावा आणि गरज ओळखून मगच कर्ज घ्यावे. व कर्जमुक्त होईपर्यंत स्वस्थ बसू नये. 

Web Title: Vastu Tips: Suffering from debt burden? Vastu Shastra's solutions will be beneficial!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.