घरात चुकूनही ठेऊ नका 'या' ५ वस्तू; अनेक अडचणी येतील, सतत संकटं कोसळतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 05:58 PM2022-03-17T17:58:15+5:302022-03-17T17:58:32+5:30
घरातील वस्तूंचा माणसांवर सकारात्मक, नकारात्मक परिणाम होतो; जाणून घ्या कोणत्या वस्तूंमुळे येतात संकटं
तुमच्या घरात असलेल्या वस्तू तुमच्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे घरात कोणत्याही वस्तू ठेवताना त्यांची निवड काळजीपूर्वक करायला हवी. अन्यथा घरातील सुख शांती धोक्यात येऊ शकते. घरात कोणत्या वस्तू ठेवल्यास समस्या, संकटं येतील, जाणून घ्या...
घरात या वस्तू कधीच ठेऊ नका
- घरात काटेरी रोपटी ठेऊ नका. निवडुंगासारखी रोपटी घरात नकारात्मकता आणतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतात. याशिवाय बोन्सायदेखील प्रगतीत अडथळा आणतं. ही रोपटी घरात वास्तूदोष निर्माण करतात.
- घरातील भिंतींवर वन्य प्राण्यांचे, युद्धांचे, उजाडज जमिनीचे, सुकलेल्या झाडांचे फोटो लावू नका. त्यामुळे घरात समस्या निर्माण होतील. घर आनंदी राहावं यासाठी रंगबिरंगी आणि मनाला बरं वाटेल, असे फोटो लावा.
- घरात कोळ्याचं जाळं असणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये आळस आणि चिडचिडेपणा वाढतो. ते संभ्रमात राहतात. त्यांची प्रगती थांबते. योग्य निर्णय घेण्यात अडचणी येतात.
- घरात नटराजाची मूर्ती ठेवणं चांगलं नसतं. त्या मूर्तीचा संबंध शिव तांडवाशी आहे. त्यामुळे नात्यांवर प्रतिकूल परिणाम होतात.
- घरात तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू ठेऊ नका. तुटलेली भांडी, फुटलेला आरसा, खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, फाटलेले फोटो, तुटलेलं फर्निचर ठेऊ नका. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आर्थिक नुकसान होतं.