Vastu Tips: तुळशीजवळ ठेवलेल्या वस्तू तर घरात वास्तू दोष निर्माण करत नाहीयेत ना? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:53 AM2024-02-01T11:53:20+5:302024-02-01T11:54:05+5:30

Vastu Dosha : वास्तू शास्त्रानुसार तुळस जेवढी पवित्र तेवढेच तिथे स्थानही पवित्र ठेवले पाहिजे, तिच्याजवळ ठेवलेल्या अतिरिक्त गोष्टी वास्तू दोष निर्माण करू शकतात. 

Vastu Tips: Things placed near Tulsi are not causing Vastu Dosha in the house? Find out! | Vastu Tips: तुळशीजवळ ठेवलेल्या वस्तू तर घरात वास्तू दोष निर्माण करत नाहीयेत ना? जाणून घ्या!

Vastu Tips: तुळशीजवळ ठेवलेल्या वस्तू तर घरात वास्तू दोष निर्माण करत नाहीयेत ना? जाणून घ्या!

हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. एवढेच नाही, तर ज्या घरात तुळशीचे रोप असते, त्या घरात नेहमी सुख-समृद्धी येते. मात्र तिच्यसंबंधित काही नियम कटाक्षाने पाळणे गरजेचे आहेत. वास्तू शास्त्रात त्याची सविस्तर माहिती दिली आहे, ती पाहू. 

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपामध्ये धनलक्ष्मी वास करते असे मानले जाते. तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही कायम राहतो. त्यासाठी पुढील नियम अवश्य पाळा. 

अंधार नसावा

एखाद्या व्यक्तीने तुळशीला अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा प्रकाश पोहोचत नाही अशा ठिकाणी ठेवल्यास तुळस तर कोमेजतेच, शिवाय कुटुंबाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. वास्तुशास्त्रात सूर्यप्रकाश येणारी मोकळी जागा तुळशीला ठेवण्यासाठी योग्य मानली जाते. ती दिशा अर्थातच पूर्व तसेच ईशान्य!

या दिशेला तुळस ठेवू नये

घराच्या दक्षिण दिशेला कधीही तुळशी ठेवू नये. कारण वास्तूनुसार ही दिशा पितरांची आणि यमराजाची मानली जाते. तुळस पवित्र असल्याने तिच्यासाठी दक्षिण दिशा योग्य नाही. तिची वाढ खुंटते. तुळशीचे रोप ठेवण्यासाठी ईशान्य दिशा उत्तम मानली जाते.

या मूर्ती जवळ ठेवू नका

लक्षात ठेवा की तुळशीजवळ गणपती किंवा शंकराची मूर्ती कधीही ठेवू नका. कारण गणपतीला दुर्वा तर शंकराला बेल प्रिय असते. शोभेसाठीही त्या मूर्ती तुळशीजवळ ठेवणे योग्य नाही. कारण ती हरिप्रिया अर्थात कृष्णाला, विष्णूंना आवडते. त्यामुळे तिच्याजवळ कोणतीही मूर्ती न ठेवणे इष्ट! तुळशीचा मान अंगणात असतो, घराच्या प्रवेश द्वारात ती स्वागतासाठी लावली जाते. तिथून घरात येणारे वारे ती प्रदूषण विरहित करते, शुद्ध करते. घरच्यांचे आरोग्य चांगले ठेवते, त्यामुळे आपोआपच घरात सुख-समृद्धी येते. 

ही चूक करू नका

बरेच लोक तुळशीचे रोप टेरेसवर ठेवतात, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे करणे योग्य मानले जात नाही. तुळशी अंगणात, खिडकीत, दाराच्या मुख्य प्रवेश द्वारावर आणि पूर्व तसेच ईशान्य दिशा पाहूनच लावावी. तसेच तुळशीच्या फांद्या किंवा पानांचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.

Web Title: Vastu Tips: Things placed near Tulsi are not causing Vastu Dosha in the house? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.