Vastu Tips: गृह प्रवेश करताना 'हा' सोपा आणि बिनखर्चिक उपाय करा, वास्तू दोष असल्यास नक्की दूर होतील.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 01:42 PM2022-05-31T13:42:42+5:302022-05-31T13:43:07+5:30
Vastu Tips: नवीन ठिकाणी गृहप्रवेश करताना वास्तू पूजा शक्य नसेल तर किमान गणेश पूजा करून गृह प्रवेश करावा असे ज्योतिष शास्त्र सांगते, तर वास्तू शास्त्र सोपे आणि प्रभावी तोडगे सांगते.
बर्याचदा लोक जुनी घरे विकत घेतात. गणेशपूजा किंवा गृह प्रवेश पूजा करतात आणि राहू लागतात. त्याचबरोबर जुन्या घरात आणखी एक छोटासा उपाय केल्यास त्या घरात आधी राहून गेलेल्या लोकांचा, वस्तूंचा आणि वास्तू लहरींचा परिणाम नष्ट होऊन वास्तू पूर्णतः शुद्ध आणि नव्या स्वरूपात हाताळता येते.
आपल्या बजेटनुसार बऱ्याचदा जुनी घरे मोठ्या प्रमाणात विकत घेतली जातात. परंतु अनेकांना वास्तू खरेदी केल्यावर राहायला जाण्यापूर्वी रंगरंगोटी, साफसफाई एवढेच वास्तू पूजा आणि वास्तू शास्त्राला महत्त्व द्यावे असे वाटत नाही. ही पूजा किंवा वास्तू शास्त्राच्या सूचना आपल्या कौटुंबिक स्वास्थ्यासाठी असून तिथे वास्तव्यास जाण्यापूर्वी करून घेतल्यास, घरातील नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते. वास्तू पूजा शक्य नसेल तर किमान गणेश पूजा करून गृह प्रवेश करावा असे ज्योतिष शास्त्र सांगते, तर वास्तू शास्त्र सोपे आणि प्रभावी तोडगे सांगते.
शनिदेवाला मोहरी प्रिय आहे. त्यामुळे वरील उपाय शनिवारी केल्यास तो जास्त प्रभावी ठरतो. मोहरीच्या काळया दाण्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची तीव्र शक्ती असते. म्हणून वास्तुशास्त्रानेही मोहरीचा वापर करायला सांगितला आहे.
घर बरेच जुने आहे. जर तेथे बराच काळ कोणी राहत नसेल तर त्या घरात स्वच्छता करून घेतल्यावर सर्वात आधी मोहरीचा प्रयोग करावा. डागडुजी करावी त्यानंतर घराला रंगरंगोटी करावी. रंगरंगोटी केल्यामुळे घरात नवचैतन्य तर येतेच, शिवाय जुन्या बाबी मिटून जातात आणि घराला नवे स्वरूप प्राप्त होते.
अशा सोप्या उपायातून आपण आपल्या घराला कायमस्वरूपी सुरक्षित ठेवू शकतो. म्हणून शास्त्रांचा आधार घ्यावा आणि अभ्यासून ते अनुसरावे.