VastuShastra :वास्तूमध्ये अशा तऱ्हेने सूर्यकिरणांचा प्रवेश झाला तर घरच काय तुमचं भाग्यही उजळेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:10 PM2022-11-28T15:10:41+5:302022-11-28T15:11:05+5:30
Vastu Tips: घरात जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढी सकारात्मकता जास्त आणि सकारात्मकता जेवढी जास्त तेवढी प्रगतीही जास्त, त्यासाठी पुढील उपाय...!
वास्तू उभारताना पूर्व दिशा पाहिली जाते. जेणेकरून वास्तूमध्ये पुरेपूर सूर्यप्रकाश व्यापून राहावा. जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून आनंद आणि शांतता नांदते. यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. सूर्यप्रकाशाच्या दिशेनुसार घरातील कोणत्या खोलीची जागा कुठे असावी हे जाणून घ्या!
वास्तुशास्त्राच्या पुढील नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये बदल केले, तर त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला काही काळातच दिसून येईल.
घरातील आर्थिक, मानसिक, शारीरिक परिस्थितीतही बदल घडताना दिसतील. त्यासाठी या किरकोळ बदलांनी सुरुवात करा.
>> सूर्योदयापूर्वीची वेळ म्हणजे पहाटे ३-६ हा ब्रह्म मुहूर्त. यावेळी सूर्य घराच्या उत्तर-पूर्व भागात असतो. हा काळ चिंतन आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे ईशान्य दिशेला तुमचे पूजागृह बनवावे.
>> सकाळी ६-९ या वेळेत सूर्य घराच्या पूर्व दिशेलाच असतो, त्यामुळे त्या दिशेने घरात सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करा. त्या दिशेला खिडकी असणे उत्तम, मात्र त्याच्या समोर काही वस्तू ठेवून सूर्यप्रकाशाला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवू नका. मोकळी हवा, सूर्यप्रकाश घरात खेळू द्या. त्यामुळे आजार पसरवणारे सूक्ष्म जीव नाहीसे होऊन कुटुंब स्वास्थ्य जपले जाईल.
>> सकाळी ९-१२ पर्यंत सूर्य घराच्या आग्नेय दिशेला असतो. ही वेळ स्वयंपाकासाठी योग्य आहे. ज्याप्रमाणे पोटाती>> ल अग्नी प्रज्वलित झाल्यावर आपण जेवतो, तसे स्वयंपाक बनवतानाही सूर्यप्रकाशाच्या उजेडात बनवलेला स्वयंपाक आरोग्यासाठी पोषक ठरेल आणि तो बनवताना गृहिणीलाही प्रसन्न वाटेल.
>> दुपारी १२-३ ही आपल्या विश्रांतीची वेळ असते. अशा वेळी सूर्य माथ्यावर आलेला असतो आणि त्यावेळेस सूर्याची प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणं बाहेर पडतात, त्यामुळे विश्रांती दरम्यान खिडक्यांना गडद रंगाचे पडदे लावून ती किरणं घरात येण्यापासून आळा घालावा.
>> अभ्यास व कामाची वेळ दुपारी ३-६ अशी असून त्यावेळेस सूर्य नैऋत्य भागात असतो. त्यामुळे स्टडी रूम किंवा लायब्ररीसाठी ही दिशा उत्तम ठरते.
>> सूर्यास्ताची वेळ न्याहारी किंवा काही जणांसाठी जेवणाची वेळ असते. सूर्यास्ताचा प्रकाश, वेळ थोडी हुरहूर लावणारी असल्याने ती वेळ टाळून किंवा त्याच्या पूर्वी आहार घेणे सोयीचे ठरते. पश्चिम दिशेला तुमच्या घराची खिडकी येत असेल तर सूर्यास्ताच्या वेळी मंद संगीत आणि चहाचा आस्वाद घेऊ शकता, फक्त पदार्थाचे सेवन टाळा. सूर्यास्तामुळे आजार पसरवणाऱ्या कीटकांचे प्राबल्य वाढते. म्हणून पूर्वी ७ च्या आत रात्रीचे जेवण उरकले जात असे.
>> झोपेच्या वेळी सूर्य अनुपस्थित असतो, परंतु सकाळ सूर्याच्या किरणांनी होणार असल्यामुळे बेडरूमची दिशा पश्चिमेला असेल तर सूर्यकिरणे थेट बेडरूममध्ये शिरकाव करतील आणि आपली मॉर्निंग आपोआप गुड होईल.
>> घरातील मौल्यवान वस्तू, पैसे ठेवण्याची जागा अर्थात तिजोरी गुप्त राहावी या हेतूने कपाटाची दिशा उत्तरेला ठेवा.
वास्तूमध्ये केलेले हे किरकोळ बदल तुम्हाला नवीन ऊर्जा देतील हे नक्की!