Vinayak Chaturthi : वर्षभरात इच्छापूर्ती करणारे विनायकाचे संकटनाशनं स्तोत्र कधी, कसे व किती वेळा म्हणावे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 08:00 AM2022-05-04T08:00:00+5:302022-05-04T08:00:01+5:30

Vinayak Chaturthi: मूळ स्तोत्र संस्कृतात असले तरी मराठीत अनुवादित केल्यामुळे याचे पठण कोणीही करू शकतो.

Vinayak Chaturthi: When, how and how many times should Vinayak's Sankatnashan hymn to be sing to fulfilled your wish throughout the year? Read on! | Vinayak Chaturthi : वर्षभरात इच्छापूर्ती करणारे विनायकाचे संकटनाशनं स्तोत्र कधी, कसे व किती वेळा म्हणावे? वाचा!

Vinayak Chaturthi : वर्षभरात इच्छापूर्ती करणारे विनायकाचे संकटनाशनं स्तोत्र कधी, कसे व किती वेळा म्हणावे? वाचा!

googlenewsNext

आज विनायक चतुर्थी आहे. त्यानिमित्त आपण महर्षी नारद यांनी रचलेल्या संकट नाशनम स्तोत्राचे महत्त्व जाणून घेऊ. हे मूळचे संस्कृत स्तोत्र कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केले. त्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही, त्यांनाही हे स्तोत्र पठण करणे सोपे झाले. त्यात गणरायची बारा नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे, की हे प्रासादिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चित मिळते. आणि फळ काय तर? विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन, पुत्रार्थ्याला पुत्र आणि मोक्षार्थ्याला गती मिळते असे म्हटले आहे. 

हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येऊ लागेल आणि वर्षभरात निश्चित फळ मिळेल असा दावा या स्तोत्राचे रचेते महर्षी नारद करतात. त्यामुळे विनायकी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी हे सोपे सुलभ आणि फलदायी स्तोत्र पठण सुरू करावे यासाठी स्तोत्राचे शब्द पुढीलप्रमाणे.. 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

Web Title: Vinayak Chaturthi: When, how and how many times should Vinayak's Sankatnashan hymn to be sing to fulfilled your wish throughout the year? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.