Vivah Muhurat 2022 : १७ एप्रिलपासून वाजणार लग्नसराईचे पडघम; २०२२ मधील विवाह मुहूर्त जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 02:21 PM2022-04-11T14:21:03+5:302022-04-11T14:22:05+5:30
Wedding Muhurat 2022: तुमचेही यंदा कर्तव्य असेल तर तुम्हीदेखील लगीन घाई करताय ना?
कोरोनाचे सावट दूर झाल्याने आणि त्यासंबंधित नियम रद्द केल्याने लग्न सराईला पुनश्च पूर्वीसारखी रंगत चढणार हे नक्की! कोरोना काळात नाही म्हणता म्हणता अनेक लग्नं पार पडली. मात्र अनेकांची मिरवायची हौस राहून गेली. मात्र आगामी काळात विवाहेच्छुक मंडळींसाठी अनेक विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे स्वतःच्या लग्नात राहून गेलेली हौस दुसऱ्यांच्या लग्नकार्यात जाऊन पूर्ण करता येईल आणि नवं दाम्पत्यांना शुभेच्छाही देता येतील. त्यादृष्टीने जाणून घेऊया २०२२ या वर्षातील आणि नजीकच्या काळातील विवाहासाठी शुभ मुहूर्त!
मंगल कार्यात ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार मुहूर्त ठरवला जातो. विवाह मुहूर्तामध्ये शुभ योगाची विशेष काळजी घेतली जाते. या कारणास्तव जेव्हा शुक्र आणि गुरू ग्रह अस्त होतात तेव्हा विवाह लांबवला जातो आणि दोन्ही ग्रहांचा उदय होताच विवाह मुहूर्त सुरू होतो. ज्योतिषाचार्यांच्या मते, चैत्र पौर्णिमा येताच एप्रिल महिन्यात लग्नसराई सुरू होईल. १७ एप्रिल ते ८ जुलै पर्यंत. त्यानंतर चातुर्मासात विवाह होणार नाहीत. त्यानंतरचे शुभ मुहूर्त कधी, किती आणि कोणते ते जाणून घेऊ.
एप्रिल महिन्यात लग्नाचा मुहूर्त
एप्रिल महिन्यात १७ पासून विवाहासाठी शुभ मुहूर्त सुरू होईल. त्यापाठोपाठ १९, २१, २२, २३ आणि २८ एप्रिल हे दिवस विवाहासाठी अनुकूल ठरतील.
मे महिन्यातील लग्नाचा मुहूर्त
मे महिन्यात २,३, ९, १०, ११, १२, १२, १७, १८ आणि २५ मे असे शुभ योग तयार होत आहेत. २६ आणि मे ३१ हे देखील काढीव शुभ मुहूर्त गणले जातील.
जून महिन्यासाठी लग्नाचा मुहूर्त
जून महिन्यात केवळ ९ लग्न मुहूर्त आहेत. ६,८, १२, १३,१४, १५, १६, २१ आणि २२ या तारखा अनुकूल आहेत.
जुलैमध्ये लग्नाचा मुहूर्त
जुलै महिन्यात ३, ५, ६ आणि ८ असे फक्त ४ लग्न मुहूर्त आहेत.
नोव्हेंबरमध्ये लग्नाचा मुहूर्त
नोव्हेंबर महिन्यात लग्नाचे एकूण ४ मुहूर्त आहेत. जे २१, २४, २५ आणि २७ नोव्हेम्बर
डिसेंबरमध्ये लग्नाचा मुहूर्त
डिसेंबर महिन्यात २,७,८, ९ आणि १४ डिसेंबरला शुभ योग तयार होत आहेत.
मग तुमचेही यंदा कर्तव्य असेल तर तुम्हीदेखील लगीन घाई करताय ना?