Vivah Rekha: तुमच्या नशिबात एकदा विवाहाचा योग आहे की दोनदा? हे सांगते तुमची हस्तरेषा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 12:24 PM2024-12-05T12:24:29+5:302024-12-05T12:24:49+5:30

Vivah Rekha: हस्तरेषेवरून तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य, विवाहाचे वय आणि एकापेक्षा अधिक विवाहाचे योग याबद्दल सविस्तर खुलासा मिळतो, कसे ओळखायचे ते पहा!

Vivah Rekha: Are you destined to marry once or twice? This is what your handwriting says! | Vivah Rekha: तुमच्या नशिबात एकदा विवाहाचा योग आहे की दोनदा? हे सांगते तुमची हस्तरेषा!

Vivah Rekha: तुमच्या नशिबात एकदा विवाहाचा योग आहे की दोनदा? हे सांगते तुमची हस्तरेषा!

प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असेल, हे हस्तरेषेच्या विवाह रेषेच्या स्थितीवरून कळू शकते. एखाद्या व्यक्तीचे लग्न कधी होईल, त्याला जीवनसाथी कसा मिळेल, त्याची आर्थिक स्थिती काय असेल, व्यक्तीचे वैवाहिक जीवन कसे असेल? इ. गोष्टी विवाह रेषेवरून कळू शकतात. ते कसे ओळखायचे ते जाणून घेऊ. 

>> हातातील सर्वात लहान बोटाखाली अर्थात करंगळी खाली लहान आडव्या रेषा असतात, या रेषा तळहाताच्या बाहेरून आतील बाजूस येतात. त्यांना विवाह रेषा (Marriage Line in Palm) म्हणतात. या रेषा हृदय रेषेच्या वर असतात.

>> ज्या लोकांच्या हातात स्पष्ट विवाह रेषा असते आणि चंद्र पर्वतावरून येणारी रेषा भेटते, अशा व्यक्ती विवाहाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांना श्रीमंत जीवनसाथी मिळतो. सासरच्या मंडळींकडून भरपूर संपत्ती आणि ऐश्वर्य मिळते. 

>> जर चंद्र पर्वतावरून एखादी रेषा लग्न रेषेसोबत पुढे सरकत असेल तर अशा व्यक्तीला जीवनसाथीकडून खूप प्रेम मिळते. त्यांच्या वैवाहिक जीवनात नेहमीच प्रेम मिळते.

>> ज्या लोकांची विवाह रेषा पुसट आणि पातळ असते, ते आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक नसतात. या लोकांमध्ये एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असू शकतात. त्यांची ओढ विवाहबाह्य संबंधांमध्ये दिसून येते. 

>> जर विवाह रेषा ठळक असेल तर अशा लोकांच्या वैवाहिक जीवनात नेहमी प्रेम आणि उत्साह असतो. पुसट विवाह रेषा (Marriage Line in Palm) असणाऱ्या जोडप्यांमध्ये उदासीनता दिसून येते.

>> ज्या लोकांच्या हातात २ समान विवाह रेषा असतात, त्यांची २ लग्न होण्याची शक्यता असते. तसेच २ रेषा असून जर रेषा तुलनेने पुसट आणि कमी जास्त असेल, तर अशा व्यक्तीचे लग्न एकदाच होते परंतु त्यांचे प्रेमसंबंध असू शकतात. 

Web Title: Vivah Rekha: Are you destined to marry once or twice? This is what your handwriting says!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.