गुरुचरित्रात सांगितलेली काशीयात्रा घरबसल्या करायची आहे? दिलेल्या तीर्थक्षेत्रांचे अनुक्रमे पठण करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 05:19 PM2021-12-15T17:19:06+5:302021-12-15T17:19:35+5:30

पंचक्रोशी यात्रा, मासिक यात्रा, दैनिक यात्रा असे सर्व तपशीलवार काशीयात्रेबद्दल सांगितले आहे. त्यामध्ये शेकडो पवित्र स्थानांचा उल्लेख आहे. 

Want to do the Kashiyatra mentioned in Gurucharitra at home? Read the given pilgrimage sites respectively! | गुरुचरित्रात सांगितलेली काशीयात्रा घरबसल्या करायची आहे? दिलेल्या तीर्थक्षेत्रांचे अनुक्रमे पठण करा!

गुरुचरित्रात सांगितलेली काशीयात्रा घरबसल्या करायची आहे? दिलेल्या तीर्थक्षेत्रांचे अनुक्रमे पठण करा!

googlenewsNext

>> मकरंद करंदीकर 

जगातील सर्व धर्मांमध्ये तीर्थयात्रेला खूप महत्व आहे. पूर्वी ते एकमेव पर्यटन होते. जगातील सर्वात जुन्या हिंदू धर्मामध्ये काशीयात्रेला खूप महत्व होते. अत्यंत कष्टाचा आणि जिकिरीचा प्रवास असायचा. चोर, श्वापदे, आजारपण, रोगाची साथ अशी अनेक संकटे येत असत. यात्रेला गेलेली कांही मंडळी परत येतच नसत. काशीयात्रा ही खूप पवित्र मानली जात असे. तेथून परत आल्यावर यात्रा करणाऱ्यांच्या सर्वजण पाया पडत असत.  

आता दत्तजयंतीच्या निमित्ताने लाखो भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. या गुरुचरित्रामध्ये ४१ व्या अध्यायात, अवधूत रूपातील तपस्व्याने त्वष्टाब्रम्हापुत्र ब्रह्मचारी या भक्ताला काशीयात्रा कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे. सुरुवात कुठून कशी करावी, कुठल्या तीर्थात स्नान करावे, देवांचे दर्शन कशा क्रमाने घ्यावे हे तपशीलवार सांगितले आहे. एका स्थानावरून निघून विविध दर्शनांनंतर पुन्हा मूळ ठिकाणी येऊन नंतर दुसऱ्या दिशेला जायचे. पंचक्रोशी यात्रा, मासिक यात्रा, दैनिक यात्रा असे सर्व तपशीलवार सांगितले आहे. त्यामध्ये शेकडो पवित्र स्थानांचा उल्लेख आहे. 

भारतात हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या विदेशी आक्रमक लुटारूंनी यातील अनेक मंदिरे उध्वस्त केली, तोडली, गाडून टाकली. नंतर रस्ता रुंदीकरण, पुनर्निमाण अशा नावाखालीही अनेक मंदिरे नाहीशी झाली. आजच्या घडीला फार थोडी मंदिरे बाकी आहेत. गुरुचरित्रातील उल्लेख आणि क्रम यानुसार मी त्या काळातील सर्व देवस्थानांची, देवांची यादी केली आहे. यात्रेची पद्धत, प्रकार यामुळे एकेका स्थानाचा अनेकदा किंवा लागोपाठ उल्लेख आहे. कांही वेळा एकाच देवाचा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख आहे. कांही ठिकाणांचा खुलासा अध्यायाच्या खाली दिलेल्या टीपांमध्ये आढळतो. हा सर्व तपशील ध्यानात घेऊन, शक्य तितकी अचूक यादी करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या तीर्थात, सरोवरात  स्नान करायला सांगितले आहे त्या तीर्थांचा उल्लेख मी केलेला नाही. केवळ जेथे पूजा, वंदन, प्रार्थना, अभिषेक करण्यास सांगितले आहे त्यांचा उल्लेख केला आहे. 

आज आपण तेथे जाऊ शकत नाही. गेलो तर अनेक स्थानेच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे माझी अशी श्रद्धा आहे की आपण या देवदेवतांना घरी बसूनही वंदन करू शकतो. यात्रेच्या शेवटी अवधूतरूपी सिद्धयोग्यांनी ब्रह्मचारी भक्ताला  स्वतःच्या नावाने एका लिंगाची स्थापना करण्यास सांगितले आहे. आपण इतके मोठे तपस्वी नाही. तरीही एक भक्त म्हणून शेवटी आपल्या नावाने एका ईश्वराचे स्मरण करणे हे मला खूप आनंददायी वाटले. केवळ या सर्व नावांच्या स्मरणाने या मार्गशीर्ष महिन्यात, दत्तजयंतीच्या निमित्ताने एक काशीस्मरण यात्रा घडेल असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी ! 

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Web Title: Want to do the Kashiyatra mentioned in Gurucharitra at home? Read the given pilgrimage sites respectively!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.