घरात भरभराट हवी? तर रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना दिव्याखाली 'हे' आसन ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:16 PM2021-03-02T18:16:27+5:302021-03-02T18:16:49+5:30
तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात.
तुळशीला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. तिला लक्ष्मी स्वरूपही मानले जाते. भगवान विष्णूंची पूजा तुळशी शिवाय अपूर्ण मानली जाते. ज्या घरात तुळशीची पूजा होते, त्या घरात कधीच दारिद्रय येत नाही. माता लक्ष्मी त्या घरात निवास करते. रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ संपन्नता येत नाही, तर सुख आरोग्यही लाभते. परंतु शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत.
>>तुळशीचे रोप साधारण कुंडीत न लावता, तुळशी वृंदावनात लावावे.
>>तुळशी वृंदावनात दिवा ठेवण्यासाठी कोनडा असतो, त्यात प्रज्वलित केलेला दिवा रोज सायंकाळी लावावा. दिवा तिथे ठेवल्याने वाऱ्यापासून सुरक्षित राहतो.
>>दिवा लावताना दिव्याखाली आसन ठेवावे. हे आसन तांदुळाचे असावे. म्हणजेच तांदुळाचे छोटेसे रिंगण आखून त्यात प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा.
>>तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर दिवा हे पूर्णत्त्वाचे प्रतीक आहे. दिव्याखाली तांदुळाचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत होते.
>>सायंकाळी तुळशीला धक्का लागणार नाही, अशा बेताने दुरूनच हात जोडून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी.
>>तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात.