यशस्वी व्हायचे आहे? ओशो सांगत आहेत यशस्वी होण्याचे गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 10:00 AM2021-02-13T10:00:00+5:302021-02-13T10:00:07+5:30

कार्यकुशल बनायचे असेल, तर एकावेळी एकच काम करा, पण मनापासून करा.

Want to succeed? Osho is telling the secret to success! | यशस्वी व्हायचे आहे? ओशो सांगत आहेत यशस्वी होण्याचे गुपित!

यशस्वी व्हायचे आहे? ओशो सांगत आहेत यशस्वी होण्याचे गुपित!

Next

काही लोक असतात, ज्यांना एक कामही नीट जमत नाही, तर काही लोक एकावेळी चार कामे बखुबीने करतात. कोणी म्हणतात शंभर गोष्टी करू नका, एकाच गोष्टीच्या मागे लागा, तर कोणी म्हणतात आताच्या काळात एका गोष्टीमागे लागून चालणार नाही, तुम्हाला चतुरस्र असावे लागते. अशावेळी कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही, हेच कळत नाही. याबाबत ओशो काय म्हणतात ते पाहू. 

लहान लहान गोष्टी करताना इतर कोणताही विचार मनात न येऊ देता संपूर्ण जागरूक त्या गोष्टीबद्दल राहील असा प्रयत्न करा. समजा शांत बसला आहात. मग श्वासाकडे पूर्ण लक्ष द्या. श्वासाबद्दल पूर्ण भानावस्था असणे ही बुद्धाने महत्वाची प्रक्रिया मानली आहे. श्वास चोवीस तास चाललेला असतो. तुम्ही काहीही केले नाही तरी तो चाललेला असतो. या सहज क्रियेबद्दल संपूर्ण जाणून घ्या आणि त्याबद्दल पूर्ण सचेत व्हा. श्वास आत जाताना जाणीवपूर्वक जाऊ द्या. श्वास आत जात आहे. परत उच्छ्वास रूपाने फिरला. बाहेर येऊ लागला. पूर्ण बाहेर गेला. परत आत आला. आत बाहेर. श्वासांची एक माळ गुंफून घ्या. एक एक श्वासोच्छ्वासाचा मणी पुढे सरकवत राहा. तुम्ही चकीत व्हाल की ही साधी क्रियासुद्धा तु्ही भानपूर्वक करत नाही, हे विसरत असता. थोडा वेळ श्वासोच्छ्वासाबद्दल पूर्ण भानावर असता. मग मन जातं दुकानात. काही खरेदी करता. काही विकता. मग कुणाशी भांडण होते. परत तुम्ही दचकता. लक्षात येते. चांगला तास निघून गेला. मी कुठे गेलो होतो? श्वास विसरूनच गेलो. परत त्या बाबतीत जाणीव होते. याला काठाकाठाने करण्याचा अभ्यास म्हणतात.

श्वासाबद्दल जागरुक अवस्था असण्यात फार त्रास नाही. तुम्ही समजा क्रोधाच्या बाबतीत अशी जागरुकता बाळगायला जाल तर काय होईल? क्रोध काही रोज एकसारखा येत नाही. कधी तरी येतो. आणि येतो तेव्हा इतक्या तीव्रतेने प्रगाढपणे येतो, त्या क्षणी इतक्या गोष्टी पणाला लागलेल्या असतात की तुम्ही कदाचित विचार कराल, ते जागरुकता, भानावस्था नंतर पाहून घेऊ. आता जे काय वाटतय ते करून घेऊ.

कामवासना तर पार खोलवर पसरली आहे. निसर्गाने तशी योजना केलेली आहे. त्यावरच जीवनाचे सातत्य अवलंबून आहे. कामवासनेच्या बाबतीत निर्विकार साक्षीभाव बाळगणे सोपे झाले असते का? की तुम्ही इच्छा धरली आणि कामवासना नाहीशी झाली, तर तुमचा जन्म कधी झाला असता का? तुमच्या आधी किती तरी लोकांनी तिच्यापासून सुटका करून घेतली असती. तुमच्या असण्याची शक्यता नसण्याच्या पातळीवर जाऊ शकली असती. तुमच्या माता पित्यांची कामवासनेतून सुटका झाली नाही, म्हणून तुम्ही आहात. तुम्हीही कामवासनेपासून इतक्या सहज सुटू शकाल का? तुम्हालाही मुलं बाळं होणार असतील. ते जीव जन्म घेण्याच्या प्रतिक्षेत असतील. तुम्ही पळ काढू शकत नाही.

म्हणूनच हाती घेतलेलं कोणतेही काम असो, ते जीव ओतून करा. त्याचा मनमुराद आनंद घ्या. मनात एक हातात एक अशी द्विधा अवस्था झाली, की एकही काम नीट होत नाही. कार्यकुशल बनायचे असेल, तर एकावेळी एकच काम करा, पण मनापासून करा. तुमच्या सभोवताली असलेली यशस्वी मंडळी तुम्हाला हेच सूत्र वापरताना दिसतील. तुम्हीदेखील हा बदल करून पहा, हा यशस्वी होण्याचा मंत्र आहे, असे समजा. 

Web Title: Want to succeed? Osho is telling the secret to success!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.