स्वतःसाठी प्रार्थना आपण नेहमी करतो, पण विश्वासाठी प्रार्थना कशी करावी? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 07:00 AM2022-11-05T07:00:00+5:302022-11-05T07:00:02+5:30

जगाचे कल्याण व्हावे अशी आपली इच्छा असते, त्यासाठी गरज असते चांगल्या विचारांची आणि सामुदायिक प्रार्थनेची!

We always pray for ourselves, but how to pray for the universe? Find out! | स्वतःसाठी प्रार्थना आपण नेहमी करतो, पण विश्वासाठी प्रार्थना कशी करावी? जाणून घ्या!

स्वतःसाठी प्रार्थना आपण नेहमी करतो, पण विश्वासाठी प्रार्थना कशी करावी? जाणून घ्या!

googlenewsNext

आरती झाल्यावर आपण मंत्र पुष्पांजली म्हणतो. पण त्याचा अर्थ काय व ती का म्हटली जाते याबाबत समाज माध्यमावर आढळलेली ही सुंदर माहिती. त्यात अज्ञात लेखकाने या श्लोकाचा सविस्तर अर्थ समजावून सांगितला आहे, तो जाणून घेऊ. 

मंत्र पुष्पांजलीत एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी  जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.

मंत्रपुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालील प्रमाणे

या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः

श्लोक१ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्
तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:

१) श्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.

२)श्लोक: ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः

३) श्लोकाचा अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची) पूर्ति प्रदान करो.

(प्रथमार्थ) ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।

श्लोकाचा अर्थ – आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

(द्वितियार्थ)  समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति।

श्लोकाचा अर्थ – आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.

तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।

श्लोकाचा अर्थ – या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.

संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.

Web Title: We always pray for ourselves, but how to pray for the universe? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.