Tarot Card: प्रवासातून प्रगती, कष्टातून यश-आनंद; टॅरो कार्ड सांगतेय तुमचे साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 13:42 IST2024-03-02T13:40:24+5:302024-03-02T13:42:12+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या तीनापैकी एक कार्ड निवडून आपल्याला भविष्य जाणून घेता येते; तुम्हीही एक कार्ड निवडून बघा...

Tarot Card: प्रवासातून प्रगती, कष्टातून यश-आनंद; टॅरो कार्ड सांगतेय तुमचे साप्ताहिक भविष्य!
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
३ मार्च ते ९ मार्च
===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा मागे येण्याचा असणार आहे. एक प्रकारे माघार घ्यावी लागेल. तुम्हाला हवे तसे घडणार नाही. अपेक्षित यश मिळण्यात काहीतरी कमतरता राहील. तडजोड करावी लागेल. पण हे करत असताना कोणाची तरी चांगली साथ मिळू शकते. प्रयत्न करुन प्रगती होईल. प्रवास घडू शकतो.
या आठवड्यात तुम्हाला शांतपणे कामे करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तडकाफडकी बोलू नका आणि निर्णय ही घेऊ नका. मध्यम मार्ग निवडा. आत्ता माघार घ्यावी लागली तरी हा काळ तात्पुरता आहे हे लक्षात ठेवा. म्हणून स्वतःला त्रास करुन घेऊ नका. उलट आत्मचिंतन करा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी खूप काम आणि कष्ट करण्याचा असणार आहे. जे करत आहात त्यात तुम्हाला प्राविण्य मिळेल. लोकांकडून कौतुकाच्या अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. पण तुम्ही संपन्न आणि आनंदी रहाल. तुमच्या आर्थिक ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल कराल. काम परिपूर्णतेकडे जाईल.
या आठवड्यात तुम्हाला बाकी कसलाही विचार न करता पूर्ण लक्ष तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आहे. भरपूर कष्ट करा. वेळ वाया घालवू नका. एखाद्या कामात कौशल्य मिळवा. चुका दुरुस्त करून, सुधारणा करा. काम एकदम चोख करा. संयम आणि स्थैर्याने काम करा. एकट्याने काम करा.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी उर्जायुक्त असणार आहे. ध्येयपूर्तीसाठी एक पाऊल पुढे टाकू शकणार आहात. झटपट घडामोडी घडू शकतात. तुमच्या आवडीच्या कामात एक प्रकारे नवीन चांगली चालना मिळेल. अडथळे येतील पण त्यावर तुम्ही कुशलतेने मात करू शकाल. तुमचा झेंडा रोवण्याचा हा काळ आहे. काही प्रवास घडू शकतात.
या आठवड्यात तुम्ही तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्यावर एकाग्रपणे काम करा. लक्ष विचलित होऊ देऊ नका. इतरांना देखील घेऊन पुढे चाला. बाकीच्यांचे मत ऐकून घ्या. काही प्रमाणात तुमचं वर्चस्व दाखवा पण त्याचा अतिरेक नको. तुम्हाला आतून जे योग्य वाटतंय, जे पटतंय तेच करा. आळस अजिबात नको.
श्रीस्वामी समर्थ.