Tarot Card: अक्षय्य तृतीया कशी जाईल? तीनपैकी एक कार्ड निवडा; वाचा साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 03:17 PM2024-05-05T15:17:05+5:302024-05-05T15:18:15+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्ड पैकी मनाचा कौल मिळेल ते कार्ड निवडायचे असते, त्यावरून साप्ताहिक भविष्याचे मार्गदर्शन मिळते.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
५ मे ते ११ मे
नंबर 1:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी देवाणघेवाण करणारा असणार आहे. इतरांच्या मदतीने तुम्ही पुढे जाणार आहात. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात, चांगले आर्थिक व्यवहार होऊ शकतात. एखादे बक्षीस किंवा आवडीची वस्तू भेट मिळू शकते.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. अडलेल्या व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा. तुमच्याकडे असलेल्या संपन्नतेचा जराही गर्व करू नका. "एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" प्रमाणे वागा!
नंबर 2:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी संभ्रम आणि शंका निर्माण करणारा ठरु शकतो. तुमचा स्वतः वरचा विश्वास कमी होऊ शकतो. इतरांनी तुमच्या डोक्यात काहीतरी घातले तर तुम्ही पूर्णपणे त्यांच्या प्रभावाखाली राहाल अशी शक्यता दिसते आहे. पण स्वतःला मजबूत ठेवले, मन भक्कम ठेवले तर हा सप्ताह तुमच्यातील कलेला, सृजशीलतेला वाव देणारा ठरेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे. मनाप्रमाणे वागता वागता तुम्ही वाहवत तर जात नाही ना याकडे लक्ष द्या. इतरांचे बोलणे किती ऐकायचे हे तुम्ही ठरवा. ध्यान मेडीटेशन प्रार्थना करा. पटकन कोणावर विश्वास ठेवू नका. "मन चंगा तो कठोती में गंगा" या प्रमाणे तुम्ही मन आनंदी ठेवले तर हा काळ आनंदी!
नंबर 3:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे. नवीन संधी उपलब्ध होण्याची चांगली शक्यता आहे. कामामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होईल. संथ पण आश्वासक अशी वाटचाल होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे. समाधानकारक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात,आरोग्यात,कामात स्थैर्य लाभेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार रहा. येणाऱ्या संधीचे सोने करुन घ्या. आर्थिक गुंतवणूक विश्वासार्ह ठिकाणी करु शकता. पाय जमिनीवर ठेवा. इतरांना सन्मान द्या, स्वतः थोडा कमीपणा घेतला तर चांगले होईल. काळजी सोडून लहान गोष्टींमध्ये आनंद माना. "मुंगी होऊन साखर खाऊन घ्या" या प्रमाणे वागा.
श्रीस्वामी समर्थ.