Tarot Card: आषाढी एकादशीचा काळ कसा असेल? तीनपैकी एक कार्ड निवडा; वाचा साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 07:07 AM2024-07-13T07:07:07+5:302024-07-13T07:07:07+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्ड पैकी मनाचा कौल मिळेल ते कार्ड निवडायचे असते, त्यावरून साप्ताहिक भविष्याचे मार्गदर्शन मिळते.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१४ जुलै ते २१ जुलै
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी आनंद आणि उमेद घेऊन येत आहे. सध्या सुरू असलेल्या त्रासातून थोडा दिलासा मिळणार आहे. जखमेवर फुंकर घालणारा हा काळ आहे. तुमच्या कृतीला वैश्विक शक्तीचे बळ मिळेल. तुम्ही जे कराल त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. "अजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु" असा अनुभव येईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही जे करत आहात तेच अधिक चांगल्या भावनेने करायचे आहे. श्रद्धेने तुमचे काम करा. चांगुलपणावर आणि विश्वाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा. नीतीने आणि विवेकबुद्धी वागा. इतरांना जेवढी जमेल तेवढी मदत करा. अवघड परिस्थितीतही खचून जाऊ नका. स्वतः साठी वेळ काढा आणि जमेल ती उपासना करा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी स्थैर्य आणि दिलासा घेऊन येत आहे. तुम्ही तुमच्या कामात संथ पण सबळ वाटचाल करणार आहात. काही अडथळे किंवा अडचणी येऊ शकतात पण त्यातून तुम्ही आणखी मजबूत आणि सक्षम होणार आहात. प्रवास घडू शकतात. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील. पण फळ मात्र सावकाश मिळेल म्हणून संयम ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही कृतिशील राहण्याची गरज आहे. तुमच्या कामात खूप कष्ट करा. जीव ओतून प्रामाणिक प्रयत्न करा. घाई न करता कोणतेही काम अधिक चांगले आणि परिपूर्ण कसे करता येईल याकडे लक्ष द्या. चिकाटीने काम केले तर उत्तम प्रगती होऊ शकेल. विश्वासाच्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकता.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी असणार आहे. तुमचे काम पूर्णत्वाकडे पोचण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्या शिक्षकांचा, मोठ्या व्यक्तींचा आणि साथीदारांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. काहीतरी नवीन शिकाल आणि शिकवाल. "आधी लगीन कोंढाण्याचे" या प्रमाणे कर्तव्याला न चुकता काम केले तर समाधानकारक फळ मिळेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला अजिबात टाळू नका. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून तुमचे चांगले होणार आहे. नियमात बसेल असेच वागा आणि त्याप्रमाणे काम करा. जोखीम किंवा चौकटीबाहेरच्या गोष्टींना आत्ता हात घालू नका. आध्यात्मिक गुरुंची उपासना करा. प्रयत्नांना प्रार्थनेची शक्ती जोडा!
श्रीस्वामी समर्थ.