Tarot Card: फेब्रुवारीचा शुभारंभ कसा होईल? तीनपैकी एक कार्ड निवडा; वाचा साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:00 AM2024-01-28T09:00:18+5:302024-01-28T09:02:09+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्ड पैकी मनाचा कौल मिळेल ते कार्ड निवडायचे असते, त्यावरून साप्ताहिक भविष्याचे मार्गदर्शन मिळते.
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२८ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी
===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी एका कठीण वळणाचा, कलाटणीचा असणार आहे. महत्त्वाचे बदल घडतील. कदाचित हे बदल तुमच्या मनाप्रमाणे नसतील पण तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल. अपेक्षित ध्येय गाठण्यात अजून वेळ आणि कष्ट लागतील. घाबरु नका, हे बदल गरजेचे असून सुधारणा करण्यासाठी गरजेचे आहेत.
या आठवड्यात तुम्ही स्वतःचा अहंकार, गर्व आणि मोठेपणा बाजूला ठेवून वागण्याची गरज आहे. आलेल्या परिस्थितीशी, होणाऱ्या बदलांशी झगडायला जाऊ नका, त्यांचा शांतपणे स्वीकार करा. मागे झालेल्या वाईट घटना पूर्णपणे विसरण्याचा प्रयत्न करा, त्यांत अडकून राहू नका. हताश होऊ नका, यांतून एक नवीन सुरुवात होणार आहे.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. एखादा प्रमुख टप्पा गाठला जाईल. त्यामुळे तुम्हाला आतून उत्साह वाटेल. एखादा कार्यक्रम ठरेल. एखादा सण साजरा केल्यासारखा आनंद होईल. सगळ्यांची साथ मिळेल. एक चांगले निष्पन्न निघेल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. पुढची वाट मोकळी होईल.
या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे चांगले परिणाम अनुभवणार आहात. त्यासाठी तुम्ही थोडी सवड काढण्याची गरज आहे. तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहून त्यांना तुमच्या आनंदात सामील करुन घ्या. आत्ता पाया मजबूत करुन पुढचे नियोजन करण्याची तयारी सुरु करा.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे. अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे. जे काही करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहे. थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल. तुमच्या सप्ताहात स्त्रियांचं वर्चस्व राहील. भाग्याची साथ राहील. अडकलेली कामे पुढे सरकतील.
या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे. उधळपट्टी बंद करुन पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे. आज जे पेराल तेच उद्या उगवेल, ही उक्ती तुम्ही या आठवड्यात लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या गोष्टीत गुंतवणूक करा.
श्रीस्वामी समर्थ.