तरुण आणि वृद्ध यांच्यातील फरक काय, याची उकल ससा आणि कासव यांच्या गोष्टीतून करूया.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:59 AM2021-05-27T09:59:59+5:302021-05-27T10:00:22+5:30
कार्यसिद्धी होण्यासाठी दोन्ही पिढ्यांनी आपापल्या परीने झुकते माप घेणे आवश्यक आहे. मग ते घर असो नाहीतर कार्यस्थळ!
एक असतो ससा आणि एक असते कासव. दोघे छान मित्र असतात. एक दिवस दोघांमध्ये एक शर्यत लागते. डोंगरावर आधी कोण पोहोचणार अशी ती शर्यत असते. कासव हळू हळू चालते आणि ससा दुडूदुडू धावत पुढे जातो.बराच पुढे आल्यावर ससा मागे वळून पाहतो, तर त्याला कासव हळू हळू येताना दिसते. ते पोहोचेपर्यंत थोडी विश्रांती घ्यावी, शेतातली गाजरं खावीत आणि मग पुढे निघावे अशा विचाराने सशाला खाऊन पिऊन गाढ झोप लागते. तोवर कासव चालत चालत तिथे पोहोचते. सशाची झोपमोड होणार नाही अशा बेताने पुढचा प्रवास करू लागते. सशाला जाग येते तोवर कासव डोंगरावर पोहोचलेले असते आणि कासवाने शर्यत जिंकलेली असते.
ही सर्वांनाच माहीत असलेली गोष्ट पुन्हा सांगण्यामागचे कारण एवढेच आहे, की आपल्याला सशासारखे दुडूदुडू धावत प्रगती करता आली नाही तरी चालेल, पण कासवासारखी थोडी थोडी प्रगती रोज करा. या लोकप्रिय प्रेरक कथेची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वय आणि अनुभव. प्रत्येकाला माहित आहे की सशाचे वय कमी आहे. तो तरुण आहे आणि चपळ आहे. कासवचे वय मात्र तीनशे वर्षांहून अधिक असते आणि निसर्गतः त्याची चाल मंद असते. त्यामुळे तरुण ससा आणि वयोवृद्ध कासव यांच्यादरम्यान वय, अनुभव आणि शारीरिक सामर्थ्यामध्ये अतुलनीय फरक आहे. सशाची पोहोच कुठवर असू शकते, याचा अंदाज अनुभवी कासवाने आधीच बांधला होता. त्यामुळे त्याने आपल्या अनुभवाच्या बळावर स्पर्धा जिंकली.
तरुण आणि वृद्ध यांच्यात नेहमीच 'जनरेशन गॅप' होती आणि ती कायम राहणार आहे. परंतु जिथे या दोन्ही पिढ्यांचे संगनमत होत नाही, तिथे प्रगती खुंटून जाते. वयोवृद्ध झालेली व्यक्ती शारीरिक कामासाठी सक्षम नसली, तरीदेखील ती अनुभवाने समृद्ध असते आणि तरुणांकडे अनुभव नसला तरी काम करण्याचा जोश असतो. म्हणून या दोन्ही गोष्टींचा मिलाप होऊन कार्यसिद्धी होण्यासाठी दोन्ही पिढ्यांनी आपापल्या परीने झुकते माप घेणे आवश्यक आहे. मग ते घर असो नाहीतर कार्यस्थळ!
वस्थापनाच्या दृष्टिकोनातून बरेच अनुभवी आणि नवीन लोक कंपनीत काम करतात. सुरुवातीच्या सक्रियतेसह हे लोक स्वत: ला वरिष्ठांपेक्षा वेगवान समजण्यास सुरवात करतात. एखाद्या आस्थापनामध्ये उच्च स्थान आणि आदर मिळवणारा एक ज्येष्ठ म्हणजे त्यांच्या अनुभवाची एक उपलब्धी आहे. त्याला माहित आहे की दीर्घ अंतरामध्ये एक प्रकारचे वर्तन आवश्यक आहे. त्याच्या निर्देशानुसार नवीन कर्मचारी अधिक चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहेत. ज्येष्ठांच्या अनुपस्थितीत, तरुणांची वागणूक देखील वेगवान धावण्याऱ्या सशासारखी असू शकते. अशा परिस्थितीत ते ध्येय गाठण्यात कोणतीही चूक चुकवू शकतात. यासाठी तरुणांनी वयोवृद्धांच्या मार्गदर्शनाची वेळोवेळी मदत घेत शर्यत जिंकावी आणि वृध्दांनीदेखील तरुणांना वेळीच जागे करून शर्यत जिंकण्यासाठी प्रोत्साहन देत राहावे.