सुख म्हणजे नक्की काय असतं? जाणून घ्या; प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून ३ जानेवारीच्या live चर्चासत्रात!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 3, 2021 08:00 AM2021-01-03T08:00:00+5:302021-01-03T08:00:07+5:30

live चर्चासत्राच्या माध्यमातून आपणही पै यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि आगामी काळात सुखासाठी आपल्या घराचे आणि मनाचे कवाड खुले करूया. आपणही या live चर्चासत्राचा जरूर लाभ घ्या आणि सुखांना म्हणा, 'या सुखांनो या!' 

What exactly is happiness? Learn; Pralhad Wamanrao Pai in live discussion session on 3rd January! | सुख म्हणजे नक्की काय असतं? जाणून घ्या; प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून ३ जानेवारीच्या live चर्चासत्रात!

सुख म्हणजे नक्की काय असतं? जाणून घ्या; प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून ३ जानेवारीच्या live चर्चासत्रात!

Next

'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' याची अनुभूती आपण सगळे रोजच घेत असतो. दुःखाचा ससेमिरा सुरू झाला, की अकल्पितपणे वाट्याला आलेल्या सुखाची गोडी आणि किंमत कळते. परंतु, क्षणिक सुखाने आपले मन भरत नाही. आपल्याला आस असते, ती चिरंतन सुखाची. ते मिळवण्यासाठी सांसारिक गोष्टींवर नियंत्रण मिळवावे लागते. ते साध्य झाले, की सुखाचा ठेवा आपल्याला गवसतो. यासाठी सांसारिक प्रश्नांकडे तटस्थपणे पाहता यायला हवे. त्यासाठी लागणारा सराव कसा असावा, हे सांगणार आहेत, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै. रविवार दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर अभिनेत्री गायत्री बनसोडे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

श्री. प्रल्हाद पै हे आपल्याला ज्येष्ठ निरुपणकार म्हणून परिचित आहेत. ते सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आहेत. जीवनविद्या तत्वज्ञानाचे ही सद्गुरू वामराव पै यांनी सुरु करून दिलेल्या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. वडिलांप्रमाणे प्रल्हाद पै यांनाही तत्वज्ञानाची आवड आहे. कारण तत्वज्ञान हे वैज्ञानिक, व्यावहारिक आणि प्रत्येक जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते. जीवनविद्या तत्वज्ञान हे मानसशास्त्र, परजीवी विज्ञान आणि मेटाफिजिक्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून समुपदेशन सत्रे घेतली आहेत आणि जीवनविद्या तत्वज्ञानाची तत्त्वे लागू करून सामान्य माणसाचे जीवन उन्नतीत आणण्यास मदत केली आहे.

या live चर्चासत्राच्या माध्यमातून आपणही पै यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि आगामी काळात सुखासाठी आपल्या घराचे आणि मनाचे कवाड खुले करूया. आपणही या live चर्चासत्राचा जरूर लाभ घ्या आणि सुखांना म्हणा, 'या सुखांनो या!' 

Web Title: What exactly is happiness? Learn; Pralhad Wamanrao Pai in live discussion session on 3rd January!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.