ओंकार ध्यान साधना अन् पाण्याचा काय आहे संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 09:00 AM2020-03-13T09:00:30+5:302020-03-13T09:01:30+5:30
या विषयावर ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील ईलीनोईस येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सादर करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली येथील लेडी आयर्विंग कॉलेजद्वारे करण्यात आलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, ईशाच्या ओंकार ध्यान कार्यक्रमात सहभागी झालेल्या क्रीडापटूंमध्ये शरीरामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक जागरूकता आढळून आली. 2011 मध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेला हा अभ्यास डॉक्टर प्रीती ऋषि लाल यांच्या क्लिनिकल अँड स्पोर्ट्स न्यूट्रिशन या विषयात सुरू असलेल्या संशोधनाचा एक भाग आहे आणि हे संशोधन खाद्यपदार्थ अभ्यास या विषयावर ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील ईलीनोईस येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सादर करण्यात येणार आहे.
सु. श्री कु. आंचल आगरवाल यांच्या मास्टर्स प्रबंधातसुद्धा प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, भारतीय खेळ प्राधिकरणाच्या “या आणि खेळा” योजनेत सहभागी होऊन प्रशिक्षण घेणार्या तरुण पुरुष हॉकी खेळाडूंच्या पाणी पिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केन्द्रित करण्यात आले होते
ओंकार का?
कु. आगरवाल आणि डॉ. लाल यांना असे आढळून आले की खेळाडूंना दिवसभरात पुरेसे पाणी पिण्याच्या आवश्यकतेचे शिक्षण देऊन देखील, बहुतांश खेळाडूंना सामन्यादरम्यान सतत डीहायड्रेशनचा त्रास झाला, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीत आणि शारीरिक क्षमतांमध्ये घट झाली, तसेच त्यांना दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्यांना देखील सामोरे जावे लागले.
डॉ. लाल म्हणतात, “खेळाडूंना शरीराच्या पाण्याच्या गरजांविषयी आधीच शिक्षण देण्यात आले होते. त्यांना त्याविषयी माहिती आणि प्रात्यक्षिकांद्वारे प्रत्यक्ष शिक्षण सुद्धा देण्यात आले होते. खरे म्हणजे जेंव्हा आम्ही त्यांच्या शरीराच्या पाण्याच्या गरजेविषयी असणाऱ्या ज्ञानाची प्राथमिक चाचणी घेतली, तेंव्हा त्यांच्यापैकी बहुतेकांनी 100% गुण मिळवले. त्यांनी काय करायला हवे याची माहिती त्यांना होती, पण ते त्याप्रमाणे वागत नव्हते. माहिती आणि वर्तणुकीतील प्रत्यक्ष बदल यांच्यात काहीतरी संबंध असणे आवश्यक होते. शरीराच्या तहानेच्या गरजेच्या पातळीविषयी जाणीवपूर्वक जागरुकता निर्माण होणे आवश्यक होते.” ओंकार हे त्याचे उत्तर होते का?
ओंकार ध्यानाचे शारीरिक आणि मानसिक पातळीवर होणारे फायदे संशोधनाद्वारे या शोधून काढण्यात आलेले आहेत. सु. श्री कु.आगरवाल आणि डॉ. लाल यांनी ईशा योग केंद्रात शिकवले जाणार्या आणि इतरत्र शिकवल्या जाणाऱ्या ओंकार ध्यानात काय फरक आहे याची तुलना केली. “नुकत्याच केल्या गेलेल्या भारतीय अभ्यासानुसार ओम हा एकाक्षरी शब्द आहे असे सांगितले गेले आहे, तर ईशा फाऊंडेशन याकडे तीन अक्षरी शब्द म्हणून पहाते,” असे सु. श्री कु. आगरवाल म्हणतात. शांभवी महामुद्रेचे सकारात्मक परिणाम यावर करण्यात आलेल्या अभ्यासाचा संदर्भ देऊन त्या पुढे असे म्हणतात, “ओमचा समावेश असणारी योग साधना केल्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते असा निष्कर्ष नुकताच पुढे आला आहे.” संशोधकांनी त्यांच्या शरीराच्या तहानेच्या गरजेच्या अभ्यासासाठी “माहिती आणि वर्तन यामधील अंतर कमी करण्यासाठी,” ओंकार हे एक ध्यानाचे साधन म्हणून निवडण्यापाठीमागे हे सुद्धा एक कारण आहे.
प्रयोगादरम्यान प्रायोगिक अभ्यासादरम्यान, 30 खेळाडूंची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली: एक नियंत्रितनियंत्रण गट – ज्यांना पुरेसे पाणी पिण्याविषयी विद्यमान शैक्षणिक पद्धत सांगितली गेली मोड्यूल प्राप्त झाले आहे – आणि प्रायोगिक गट – ज्यांना शैक्षणिक पद्धत सांगितली गेली मोड्यूल प्राप्त झाले आहे आणि ज्यांनी 21 दिवस प्रत्येक दिवशी 21 मिनिटे ओंकार ध्यानाची लहानशी साधना केली. 21 दिवसांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर, चाचण्यांमध्ये असे दिसून आले की सामना संपल्यानंतर, ओंकाराची साधना करणाऱ्या खेळाडूंमध्ये नियंत्रण गटाच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण अधिक चांगले आहे. यामुळे हृदयाची गती आणि शारीरिक चपळता मोजण्याच्या चाचण्यामध्ये सुद्धा त्यांची कामगिरी अधिक चांगली दिसून आली. खेळाडूंनी असे सुद्धा सांगितले की ते अधिक आनंदी आणि शांत झाले आहेत आणि खेळाकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केन्द्रित करत आहेत.
डॉ. लाल म्हणतात, “अनेक खेळाडू माझ्याकडे येऊन म्हणाले की त्यांच्या खेळामधील कामगिरीव्यतिरिक्त त्यांना इतर फायदेदेखील मिळत आहेत. एका खेळाडूने मला सांगितले की घरातील इतर प्रत्येक व्यक्तीशी असणारे त्याचे संबंध आता सुधारले आहेत. या अभ्यासादरम्यान त्यांच्यात बरीच परिपक्वता आल्यासारखे वाटते. या अभ्यासामुळे संधीचे एक मोठे क्षेत्र खुले झाले आहे. ईशामध्ये शिकवल्या जाणार्या ध्यानामुळे होणार्या फायद्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही आणखी दोन अभ्यासांची योजना आखली आहे.”