शांभवी महामुद्रेत खास असे काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:53 AM2020-03-16T07:53:39+5:302020-03-16T07:54:14+5:30
“ध्यान” हा शब्द अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. सर्वसाधारणपणे तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केन्द्रित करत असाल, तर लोकं म्हणतील की तुम्ही ध्यान करत आहात.
आज जगभर उपलब्ध असणार्या अनेक ध्यान पद्धतींमध्ये शांभवी महामुद्रा कशामुळे खास बनते, या प्रश्नाचे उत्तर सद्गुरु देतात.
ध्यानापासून महामुद्रेपर्यन्त
सद्गुरु: “ध्यान” हा शब्द अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. सर्वसाधारणपणे तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केन्द्रित करत असाल, तर लोकं म्हणतील की तुम्ही ध्यान करत आहात. तुम्ही सदैव एकाच गोष्टीचा विचार करत असाल, तर लोकं म्हणतील की तुम्ही ध्यान करत आहात. तुम्ही जर सतत एकच शब्द, मंत्र किंवा इतर काही उच्चारत असाल, तर त्यालासुद्धा ध्यान असेच म्हणतात. किंवा तुमच्या भोवताली किंवा तुमच्या शारीरिक प्रणालीमध्ये घडणार्या घडामोडींविषयी तुम्ही नसिकदृष्ट्या जागरूक असाल, तर त्यालादेखील ध्यान असेच म्हणतात. शांभवी यापैकी कोणत्याच प्रकारात मोडत नाही. आणि म्हणूनच आम्ही याला महामुद्रा किंवा क्रिया असे म्हणतो. मुद्रा म्हणजे काय? मुद्रा या शब्दाचा अर्थ “कुलूप” आहे – म्हणजे तुम्ही कुलूप लावून बंद करता. सध्याच्या जगात यापूर्वी कधीही नव्हती येवढ्या प्रमाणात निर्माण झालेली समस्या म्हणजे ऊर्जेचा व्यय, कारण मानवतेच्या इतिहासात आज आपली ज्ञांनेद्रिय प्रणाली पूर्वीपेक्षा अधिक उत्तेजित बनली आहेत. उदाहरणार्थ, आपण संपूर्ण रात्र प्रखर दिव्यांच्या उजेडात बसू शकतो. तुमचे डोळे यापूर्वी यासाठी सरावले नव्हते – त्यांना बारा तास प्रकाश आणि बारा तास अंधाराची किंवा अंधुक प्रकाशाची सवय होती. आता आपले दृष्टीचे इंद्रिय अतिशय उत्तेजित झाले आहे.
शरीर प्रणालीवर अधिक ताण: इंद्रिये अतिउत्तेजित होणे
पूर्वीच्या काळी, तुम्हाला कोणताही आवाज ऐकू यायचा असेल, तर सिंहाला डरकाळी फोडायला लागायची, हत्तीला तुतारी फुंकायला लागायची किंवा इतर कोणता उत्तेजक आवाज ऐकू यावा लागत असे; अन्यथा सारे काही शांतच असे. आता मात्र सगळीकडे सदैव आवाज सुरूच असतात. तुमच्या कानांवर खूप अधिक आवाज पडत आहेत. पूर्वी, काही रंगीबेरंगी पहायचे असेल, तर तुम्हाला सूर्यास्तापर्यन्त थांबायला लागत असे. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना ते दृश्य पहाण्यासाठी बोलवण्याआधीच, सूर्यास्त होत असे. आता, तुम्ही दूरदर्शन सुरू केला, की तुम्ही संभ्रमात पडाल असे सर्व प्रकारचे रंग एका पाठोपाठ एक अतिशय वेगाने तुम्हाला दिसत राहतात.
तर सध्या आपण आपल्या ज्ञांनेद्रियांना पूर्वी कधीही दिली नव्हती येवढी अधिक माहिती पुरवतो आहोत. जेंव्हा तुमच्यात या पातळीवरील संवेदना माहिती उपलब्ध असते, तेंव्हा तुम्ही येथे बसता, आणि “ओम, राम” असे किंवा तुम्हाला हवे ते म्हणता, आणि ते सुद्धा वेगाने सतत होत राहते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये एक शक्तीशाली प्रक्रिया निर्माण करत नाही, तोपर्यंत सध्याच्या जगात, बहुतांश लोकं दिवास्वप्न न पाहता डोळे मिटून बसून राहू शकत नाहीत.
उर्जेचा व्यय विरुद्ध दिशेने करणे
आणि म्हणूनच, महामुद्रा करणे आवश्यक आहे, कारण हे एक कुलूप आहे. एकदा का तुम्ही हा कुलूप लावून बंद केलंत, की तुमच्यामधील ऊर्जा अगदी भिन्न दिशेने वळतील. आणि आता गोष्टी घडायला सुरुवात होईल. पहिल्याच दिवशी शांभवी महामुद्रा लोकांना जो आश्चर्यकारक अनुभव देते तसा अनुभव कोणत्याही क्रियेने क्वचितच अनुभवता येतो. हे केवळ यामुळे घडते, की जर तुम्ही महामुद्रा योग्य प्रकारे वापरली, तर तुमच्यामधील ऊर्जा पूर्वी सहसा कधीही न गेलेल्या दिशेला वळतात. अन्यथा, तुमच्यामधील ऊर्जा आपल्या विविध संवेदी माहितीला प्रतिसाद देऊन नष्ट होते. हे असे आहे की तुम्ही जर एखाद्या गोष्टीकडे पहात राहिलात, तर काही वेळाने तूम्ही थकून जाल. केवळ तुमचे डोळेच नव्हे – तुम्हीसुद्धा थकून जाल. कारण जेंव्हा प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता,तेंव्हा तुम्ही तुमची ऊर्जा गमावता. प्रकाशाचा किरण तुमच्या दिशने आला, तर तुम्ही तो पहाताना ऊर्जा नष्ट होते. एखादा आवाज तुमच्या दिशेने आला, तर तुम्ही तो ऐकताना ऊर्जा नष्ट होते. आम्हाला यात असा बदल घडवायचा आहे, की तुम्हाला त्यापासून फायदा मिळेल. तुम्हाला ग्रहणशीलतेच्या योग्य पातळीवर घेऊन जाता यावे म्हणून या एकवीस मिनिटांच्या साधनेसाठी तुम्हाला मानसिक आणि भावनिकरित्या तयार करण्यासाठी आम्ही येवढा वेळ खर्च करतो.
भरीव परिणामाचा वैज्ञानिक पुरावा
शांभवीवर बरेच वैज्ञानिक संशोधन होत आहे. सध्याच्या जगात, तुमच्या स्वतःमध्ये काय घडते आहे तेवढे पुरेसे नाही. ते प्रयोगशाळेत मोजले जाणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की शांभवी साधना केलेल्या लोकांमधील कोर्टीसोल या संप्रेररकाला देण्यात येणारा प्रतिसाद लक्षणीय प्रमाणात अधिक आहे. बीडीएनएफ, या मेंदूमधील घटकाचे प्रमाण सुद्धा वाढते.
कॉर्टीसोल या संप्रेररकाला देण्यात येणारा प्रतिसाद अनेक प्रकारांनी जागृती वाढवतो. ज्ञानोदयाला देखील जागृती असे म्हणतात. का? तुम्ही अगोदरच जागृत नाहीहात का? नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी जागृतीच्या एकाच पातळीवर नसता. तुम्ही जर किमान नव्वद दिवस शांभवीचा सराव करत असाल, तर तुम्ही सकाळी उठल्यावर तीस मिनिटांनी सर्व सामान्य व्यक्तीपेक्षा तुमचा कॉर्टीसोल या संप्रेररकाला देण्यात येणारा प्रतिसाद अनेक पटींनी अधिक असतो.
वेदना रोधक, वय रोधक, तणाव रोधक
वेदनांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात फरक पडतो. आणि तुमचे डीएनए दाखवतात की नव्वद दिवसांच्या साधनेनंतर, पेशींच्या पातळीवर तुम्ही होतात त्यापेक्षा 6.4 वर्षे तरुण झाला आहात. हे सर्व जबाबदार शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, सर्वात छान गोष्ट म्हणजे, मेंदू कार्यरत असताना देखील तुमच्यामधील शांतपणा अनेक पटींनी वाढतो. हा शांभवीचा अद्वितीय परिणाम आहे.
अमेरिकेत केले गेलेले अभ्यास बहुतांश बौद्ध ध्यान पद्धतींवर केले गेले आहेत, योगाच्या इतर पद्धतींवर नाही. बौद्ध ध्यान पद्धतींचा महत्वाचा पैलू म्हणजे लोकं शांत, प्रेमळ बनतात; पण त्याच वेळेस, मेंदूचे कार्यदेखील कमी होते. शांभवीचा महत्वाचा पैलू हा आहे की लोकं शांत, प्रेमळ बनतात; पण त्याच वेळेस, मेंदू मात्र अधिक कार्यरत बनतो.
समस्याविरहित शांती आणि संधी
तुमचा मेंदु कार्यरत असणे आवश्यक आहे. अध्यात्माच्या नावाखाली, लोकं शांतपणे बसून “राम राम” किंवा इतर काही मंत्र म्हणत बसलेली दिसतात. तुम्ही अगदी “डिंग डॉन्ग्ग डिंग” या शब्दांची जरी पुनरावृत्ती केली, तरीसुद्धा तुम्ही शांत व्हाल. हे एका अंगाई गीतासारखे आहे. इतर कोणी तुमच्यासाठी गात नसेल, तर तुम्हीच स्वतःसाठी ते गा. त्याने तुम्हाला मदत मिळेल. प्रत्येकजण अशा युक्त्या वापरत असतात, ज्या त्यांना आजाणतेपणे मिळालेल्या असतात, आणि त्या ते पुन्हा पुन्हा वापरत असतात. मग तो तथाकथित पवित्र ध्वनी असो किंवा इतर कोणताही मूर्खासारखा आवाज असो, तुम्ही जर तो पुन्हा पुन्हा म्हणत गेलात, तर एक प्रकारची मरगळ येईल. मरगळीला नेहेमीच शांती समजण्याची चूक केली जाते.
सध्या आपल्याला असणारी एकमेव समस्या म्हणजे आपल्या मेंदुची क्रिया. तुम्ही जर मेंदुची क्रिया थांबवली, तर तुम्ही शांत आणि सुंदर बनू शकता, पण तुमच्यातील सगळ्या शक्यता नाहीशा होतील. मूलभूतरित्या मानवाची समस्या केवळ हीच आहे: ते शक्यतांकडे समस्या म्हणून पहात असतात. तुम्ही जर शक्यता दूर केल्यात, जर तुम्ही तुमचा अर्धा मेंदुच काढून टाकलात, तर नक्कीच समस्या संपेल. पण शक्यता वाढविणे आणि तरीदेखील त्यामुळे समस्या न होणे – ही शांभवी महामुद्रेची अद्वितीयता आहे.