जेव्हा आयुष्य निरस वाटू लागेल, तेव्हा 'या' रामायणाची पटकन उजळणी करा, मनाला उभारी मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 07:00 AM2022-07-18T07:00:00+5:302022-07-18T07:00:02+5:30

'आयुष्यात राम उरला नाही' असे आपण म्हणतो, पण आपणही रामायणाचे एक भाग असतो; कसे ते वाचा!

When life starts to feel dull, quickly revise 'this' Ramayana, the mind will be uplifted! | जेव्हा आयुष्य निरस वाटू लागेल, तेव्हा 'या' रामायणाची पटकन उजळणी करा, मनाला उभारी मिळेल!

जेव्हा आयुष्य निरस वाटू लागेल, तेव्हा 'या' रामायणाची पटकन उजळणी करा, मनाला उभारी मिळेल!

Next

आयुष्य कंटाळवाणे वाटू लागले की आयुष्यात राम उरला नाही असे आपण म्हणतो. परंतु रामाशिवाय आपले आयुष्यच पूर्ण होणार नाही, याची प्रचिती आपल्याला फार उशिरा येते. जे रामायण रामकथेमुळे आपल्याला गोड वाटते, त्या रामायणाचे आपणही एक भाग असतो. नव्हे तर ते रामायण आपल्या आतच घडत असते. मग राम उरला नाही असे म्हणून कसे चालेल? या गोष्टीची जाणीव करून देणारी एक सुंदर कविता-

|| शरीरी वसे रामायण ||

जाणतो ना कांही आपण
शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||

आत्मा म्हणजे रामच केवळ,
मन म्हणजे हो सीता निर्मळ !
जागरुकता हा तर लक्ष्मण,
शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||

श्वास, प्राण हा मारुतराया,
फिरतो जगवित आपुली काया |
या आत्म्याचे करीतो रक्षण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||२||

नील जाम्बुवंत रक्त नसा या,
फिरती शोधत जनक तनया
गर्वच म्हणजे असतो रावण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||३||

रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर,
भाव भावना त्यातील वावर
मोहांधता करी आरोग्य भक्षण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||४||

नखें केंस त्वचा शरीरावरती,
शरीर नगरीचे रक्षण करती
बंधु खरे हे करती राखण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||५||

क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,
शांत असता घोरत पडतो
डिवचताच त्या करी रणक्रंदन
शरीरी आपुल्या वसे रामायण ||६||

गर्वे हरले सौख्य मनाचे
कांसाविस हो जीवन आमुचे
संकटी येई शरीर एकवटून
शरीरी आपुल्या वसे रामायण ||७||

मनन करता भगवंताचे,
रक्षण होईल आरोग्याचे
राम जपाचे अखंड चिंतन
शरीरी आपुल्या वसे रामायण ||८||

|| श्री रामार्पणमस्तु ||

Web Title: When life starts to feel dull, quickly revise 'this' Ramayana, the mind will be uplifted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.