झोपताना तुमचे डोके उत्तर दिशेला नाही ना, याची खात्री करून घ्या;कारण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 12:08 PM2021-03-24T12:08:18+5:302021-03-24T12:08:37+5:30
हिंदूंच्या धार्मिक मान्यतेनुसार मृतकाचे डोके उत्तर दिशेला करतात. वैज्ञानिक मतानुसार उत्तर ध्रुव चुंबकीय क्षेत्रात सर्वात शक्तिशाली ध्रुव आहे.
मनुष्य झोप आली की दशा दिशा न पाहता पाठ टेकवून त्वरित डोळे मिटतो आणि गाढ झोपी जातो. परंतु, अशा झोपेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. आणि झोप साऱ्या व्याधींचे कारण बनते. वाईट स्वप्नं पडतात. प्रकृती खालावते. आर्थिक समस्या निर्माण होतात. या सगळ्या गोष्टी नुसत्या चुकीच्या झोपेमुळे कारणीभूत ठरतात. म्हणून वास्तुशास्त्राने झोपेच्या दिशेचीही दखल घेत त्याचे अभ्यासपूर्ण विवरण केले आहे. चला तर जाणून घेऊया, झोपताना उत्तर दिशेला डोकं का नसावे.
हिंदूंच्या धार्मिक मान्यतेनुसार मृतकाचे डोके उत्तर दिशेला करतात. वैज्ञानिक मतानुसार उत्तर ध्रुव चुंबकीय क्षेत्रात सर्वात शक्तिशाली ध्रुव आहे. उत्तरी ध्रुवाच्या तीव्र चुंबकत्त्वामुळे मस्तिष्काची शक्ती नष्ट होते. म्हणून उत्तर दिशेला डोके करून झोपू नये.
मृतकाचे डोके उत्तर दिशेला का करतात?
मृत्यू काळासमयी मनुष्य उत्तर दिशेला डोके करून झोपवतात कारण प्राणाच्या उत्सर्गाच्या दिशा चुंबकीय विद्युत प्रवाहाच्या दिशेने म्हणजे दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे प्रवाहित होते. असे म्हणतात, की मृत्यूनंतर काही क्षण प्राण मस्तिष्कामध्ये राहतो. त्याला त्वरित गती मिळावी, म्हणून मृतकाचे डोके उत्तर दिशेला ठेवतात.
याच कारणास्तव झोपताना उत्तर दिशेने डोके ठेवून झोपू नये, जेणेकरून अरिष्ट टाळता येते.