आपल्या भाग्यात राजयोग आहे की नाही, हे स्वतःच तपासून पहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 11:04 AM2021-04-03T11:04:00+5:302021-04-03T11:06:11+5:30
राजयोगाची चिन्हे स्त्रियांच्या डाव्या आणि पुरुषांच्या उजव्या बाजूला दिसून येतात.
Next
आपल्या केवळ हस्तरेखाच नाही, तर आपली शारीरिक रचनादेखील आपले भाकीत सांगते. त्यालाच सामुद्रिक शास्त्र असे म्हणतात. फक्त ते वाचणारी व्यक्ती सदर विषयातील जाणकार हवी. आपला त्या शास्त्रात अभ्यास नाही. परंतु या शास्त्रातील अभ्यासू मंडळींकडून मिळालेल्या माहितीनुसार काही गोष्टींचे परीक्षण करून आपणही आपल्या भाग्यात राजयोग आहे की नाही हे तपासून पाहू शकतो. कसे ते पहा...
- राजयोगाची चिन्हे स्त्रियांच्या डाव्या आणि पुरुषांच्या उजव्या बाजूला दिसून येतात.
- ज्यांचा खांदा रुंद, नाक सरळ आणि बेंबी खोलगट असते, असे लोक आत्मविश्वासाने युक्त असतात. ते त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करू शकतात. त्यामुळे सिद्धी आणि प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला येऊन राजयोगाची द्वारे आपोआप खुली होतात.
- ज्या लोकांच्या पायाच्या तळव्यावर अंकुश, चक्र किंवा कुंडल असे चिन्ह दिसते, त्यांच्या ठायी नेतृत्त्व, शासन, राजकारण, व्यापार हे योग चालून येतात.
- ज्या महिलांच्या तळ हातावर तीळ असतो त्यांच्यावर वैभवलक्ष्मीची कृपादृष्टी असते. तसेच ज्या पुरुषांच्या तळ हातावर तीळ असतो, ते ज्या वस्तूला स्पर्श करतील त्याचे सोने करण्याची ताकद त्यांच्यात असते.
- ज्यांच्या तळ हातावर ध्वज, मासा, वीणा, चक्र, कमळ अशी चिन्हे दिसतात, त्यांना आर्थिक अडचणींना विशेष सामोरे जावे लागत नाही. अशा लोकांना कमी काळात भरपूर प्रसिद्धी मिळते.
- ज्यांच्या तळ पायावर तीळ असतो, त्यांना कमी वयातच वाहन खरेदीचा योग येतो. तसेच देश-विदेश वारीचे योग येतात.
- ज्यांच्या तळ पायावर कमळ, बाण, रथ, सिंहासन अशी चिन्हे दिसतात, त्यांना भूमिखरेदीत पुष्कळ लाभ होतो.
- ज्यांच्या अंगावर पुष्कळ लव असते, असे लोक अतिशय दयाळू आणि समाधानी असतात. त्यांच्यावर लक्ष्मीची देखील कृपादृष्टी असते.
- ज्यांना हाताला किंवा पायाला सहा बोटे असतात ते अतिशय निष्ठावान आणि श्रीमंत असतात. तसेच ज्यांच्या उजव्या गालावर तीळ असतो, तेही लोक नम्र आणि श्रीमंत असतात.
- ज्यांच्या हस्तरेखा ठळक आणि सुटसुटीत असतात त्यांचा भाग्योदय उशिरा होतो पण कायमस्वरूपी होतो. अशा लोकांना गुप्तधन किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होतो.