जगाचे प्रेम मिळो ना मिळो, कुटुंबाचे प्रेम मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते चिरंतन टिकणारे असते!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 02:34 PM2022-02-14T14:34:13+5:302022-02-14T14:34:39+5:30

आपल्या कुटुंबावर प्रेम करा आणि त्यांची ताकद बना. तरच बाह्य जगाशी लढायला सक्षम व्हाल!

Whether you get the love of the world or not, it is very important to get the love of family, because it lasts forever! | जगाचे प्रेम मिळो ना मिळो, कुटुंबाचे प्रेम मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते चिरंतन टिकणारे असते!

जगाचे प्रेम मिळो ना मिळो, कुटुंबाचे प्रेम मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ते चिरंतन टिकणारे असते!

Next

आपल्या जडण घडणीत कुटुंबाचा वाटा अतिशय महत्त्वाचा असतो. तसेच आपल्या यशाला, प्रगतीला कौटुंबिक पाश्र्वभूमी जबाबदार ठरत़े  जगाचे प्रेम आपल्या यशापयशावर अवलंबून असते, मात्र घरच्यांचे प्रेम चिरंतन टिकणारे असते. मात्र, त्यांनीच अव्हेरले, तर मनुष्याचा कोंडमारा होऊ शकतो. म्हणून घरातले वातावरण सकारात्मक, प्रेमळ आणि ऋणानुबंध जपणारे असावे लागते. अन्यथा...

एक जवान युद्धासाठी गेलेला असतो. त्याचे घरचे दिवस रात्र बातम्या, वृत्तपत्र यावर लक्ष ठेवून युद्ध कधी संपते आणि आपला जवान सुखरूप घरी कध येईल याची वाट पाहत असतात. दोन महिने युद्ध चालते. एक दिवस बातमी कळते, युद्ध संपले, विजय मिळाला. घरच्यांचे आपल्या मुलाशी बोलणे होते. ते म्हणतात, `तुझी खूप काळजी लागून राहिली होती. तु लवकरात लवकर घरी ये.' 

पलीकडून मुलगा म्हणतो, `हो बाबा मी घरी येणार आहे. पण माझ्या बरोबर एक मित्राला घरी आणतोय. कायमस्वरूपी! युद्धात त्याचा एक हात, एक पाय गेला. त्याला सांभाळायला दुसरे कोणी नाही. त्याला आणले तर चालेल ना?'

वडील म्हणाले, `काही दिवसांसाठी ठीक आहे, पण कायमस्वरूपी नको. नाहीतर तो आपल्याला डोईजड होईल. आपल्याला त्याची सेवा करावी लागेल. त्यामुळे मला वाटते तू त्याला आणूच नकोस, तू एकटा ये.'

जवानाने फोन ठेवला. दोन दिवसांनी त्याच्या घरी पुन्हा फोन गेला. तुमच्या मुलाने आत्महत्या केली आहे. आणि मृत्यूपत्रात लिहिले आहे, की `प्रिय बाबा, युद्धात हात, पाय गमावलेली व्यक्ती माझा मित्र नसून मी स्वत: होतो आणि तुम्हाला डोईजड होणार होतो. याची पूर्वकल्पना मिळाल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे. मी माझी मातृभूमीसाठी केलेली सेवा पूर्ण केली, परंतु तुमची सेवा करण्यास मी असमर्थ ठरलो.'

हे ऐकून जवानाच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांना स्वत:च्याच विचारांची लाज वाटली. भविष्यात आपली चूक सुधारण्यासाठी त्यांनी दिव्यांगासाठी सेवाश्रम सुरू केला, मात्र आपल्या कोवळ्या वयातल्या मुलाला ते वाचवू शकले नाहीत, ही खंत कायम त्यांच्या मनाला सलत राहिली. 

घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती!

Web Title: Whether you get the love of the world or not, it is very important to get the love of family, because it lasts forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.